शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आता बेस्ट बसगाड्यांचा लाल रंग उडणार

By admin | Updated: April 22, 2017 03:25 IST

बेस्ट उपक्रमाची ओळख ठरलेला ऐतिहासिक लाल रंग लवकरच उडणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला ‘अच्छे दिन’ यावेत, यासाठी अनेक नवे बदल केले जाणार आहेत.

मुंबई : बेस्ट उपक्रमाची ओळख ठरलेला ऐतिहासिक लाल रंग लवकरच उडणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला ‘अच्छे दिन’ यावेत, यासाठी अनेक नवे बदल केले जाणार आहेत. या बदलास मुंबईकरांनी स्वीकारल्यास, पांढऱ्या व पिवळ्या रंगात बेस्टच्या बसगाड्या रंगून निघणार आहेत.सार्वजनिक वाहतूक, मोनो-मेट्रो, शेअर रिक्षा-टॅक्सीच्या स्पर्धेत मागे पडलेल्या बेस्टपुढे तिकिटाद्वारे मिळणारे उत्पन्न हाच उत्पन्नाचा प्रमुख मार्ग. भाडेवाढीचा मार्ग अवलंबल्यास प्रवाशी संख्या कमी होत असल्याने, बेस्टने आता नवीन प्रयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याची तयारी केली आहे. यात बसगाडीला नवीन रंग, गाडीमध्ये व बस स्टॉपवर मोफत वाय-फाय सेवा, गाडीची वेळ व अन्य माहिती देणारे मोबाइल अ‍ॅप आदी मार्ग अवलंबण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून बसगाडीचा रंग बदलण्याच्या हालचालीही होताना दिसत आहेत. अशा दोन बसगाड्या बेस्टच्या कुलाबा येथील भवनाच्या आवारात दिमाखात उभ्या आहेत. जे. जे. इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅप्लाइड आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या दोन बस गाड्या आहेत. पिवळ्या व पांढऱ्या रंगातील या बसगाड्या तयार झाल्या की, प्रवाशांच्या पसंतीसाठी रस्त्यावर धावतील. पुढील सहा महिन्यांत प्रवाशी, बस चालक आणि वाहक व मेकॅनिककडून प्रतिसाद घेऊन, इतर बसेसही याच रंगाच्या असाव्यात का, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)रंग बदलण्यास विरोधलाल रंगाची बसही बेस्टची ओळख आहे. रंगात बदल केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत, बसचा रंग बदलण्यास बेस्ट समिती सदस्यांनी विरोध केला आहे. पांढऱ्या रंगाचा बेरंग होण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली आहे.या आधी उपनगरीय रेल्वे गाड्यांचा रंग बदलून, मरून रंगाचा पिवळा, पांढरा व जांभळा रंग करण्यात आला.बेस्टच्या ताफ्यात ३८०० बस गाड्या असून, १२० डबल डेकर बस गाड्या आहेत. वातानुकूलित २६६ बस गाड्या वगळून, उर्वरित बहुतांशी बसेस लाल रंगाच्याच आहेत.- बेस्टने आता नवीन प्रयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याची तयारी केली आहे. यात बसगाडीला नवीन रंग, गाडीमध्ये व बस स्टॉपवर मोफत वाय-फाय सेवा, गाडीची वेळ व अन्य माहिती देणारे मोबाइल अ‍ॅप आदी मार्ग अवलंबण्यात येणार आहेत.- बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांतून १० वर्षांपूर्वी ४२ लाख प्रवाशी प्रवास करत. ही संख्या आता २९ लाखांवर आली आहे.जे. जे. आर्टच्या पाच विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मदतीने बसेसच्या नवीन - रंगाचे नियोजन केले आहे. १९६० मध्ये जे. जे.च्याच विद्यार्थी व प्राध्यापकांनी बसचा लोगो तयार केला होता. यामध्ये बल्बच्या आत बस दाखवण्यात आली आहे.