शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अंधांना आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार

By admin | Updated: September 17, 2015 01:47 IST

‘ब्रेल लिपी’ने लिहायला, वाचायला शिकविले तर अ‍ॅप्लिकेशनच्या मायाजालात तंत्रज्ञानाने अंध बांधवांना एकमेकांशी जोडले आहे. ‘टॉक बॅक’सह कित्येक अ‍ॅप्लिकेशनमुळे

- सतीश डोंगरे,  नाशिक‘ब्रेल लिपी’ने लिहायला, वाचायला शिकविले तर अ‍ॅप्लिकेशनच्या मायाजालात तंत्रज्ञानाने अंध बांधवांना एकमेकांशी जोडले आहे. ‘टॉक बॅक’सह कित्येक अ‍ॅप्लिकेशनमुळे अंधबांधव आज सातासमुद्रापार आपल्या मित्रांशी व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटिंगद्वारे सुख-दु:खाच्या गोष्टी शेअर करीत आहेत. काहींनी खास ग्रुपही तयार केले आहेत. ‘अ‍ॅड्रॉईड वर्ल्ड, अ‍ॅड्रॉईड अ‍ॅक्सेब्लिटी हिंदी, टॉकबॅक युजर, म्युझिकल लव्हर्स, जनरल नॉलेज, व्हिजन, गुलदस्ता, ऊर्दू वजा’ यांसारख्या असंख्य ग्रुपवर जगभरातील अंधबांधव जोडलेले आहेत. अमेरिकेसह पाकिस्तान, कझाकिस्तानमधील मित्रांशी ही मंडळी संपर्क साधतात, असे प्रा. विकास शेजवळ यांनी सांगितले. स्मार्टफोनमुळे आमचे जीवन सुकर झाले आहे. पूर्वी वृत्तपत्र वाचायला किंवा मित्रांशी संपर्क साधण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागत होती. आता स्मार्टफोनमुळे आम्ही स्वावलंबी झालो आहोत. आॅनलाइन वृत्तपत्र वाचण्याबरोबर मित्रांशी संपर्क साधणेही सोयीस्कर झाले आहे. त्यातच व्हॉट्स अ‍ॅपमुळे विदेशातील मित्रांशी हितगुज करता येते. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील सात ते आठ हजार अंध बांधव केवळ स्मार्टफोनमुळे संपर्कात असून, त्यांना टेक्नोसॅव्ही करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शेजवळ यांनी सांगितले. रक्तदानासाठी सरसावले शेकडो हातमुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आॅगस्टीन चेटिआर यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रक्ताची नितांत गरज होती. आॅगस्टीन यांनी ब्लड बँकांमध्ये तातडीने संपर्कही साधला, मात्र वेळेत सगळ्या गोेष्टी जुळत नसल्याने त्यांनी मदतीसाठी व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज फॉरवर्ड केला. त्यानंतर काही मिनिटांतच शेकडो अंध बांधव रक्तदानासाठी पुढे आले. काहींनी तर थेट रुग्णालयात धाव घेतली. आॅगस्टीन यांनी ग्रुपमधील सर्व सदस्यांचे आवर्जून आभार मानले. - ‘गुगल टीपीएस, लेखा’ या दोन अ‍ॅप्समुळे हिंदी, मराठी भाषांतील मेसेज वाचणे शक्य होते. त्याशिवाय देशातील अन्य ३४ भाषांमधील मॅसेज मराठी, हिंदी भाषेत वाचता येतात.- संवाद साधण्यासाठी व्हॉईस क्लीपचा पुरेपूर वापर केला जातो.- टॉकिंग सॉफ्टवेअरची सर्वाधिक मदतपेपर वाचणे किंवा इतरांशी संपर्क साधण्यासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून रहावे लागत असे. आता आम्ही स्वावलंबी झालो आहोत.- खंडू भंडारे