शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

आता ‘एम-इंडिकेटर’वरही नोंदवा तुमची प्रतिक्रिया

By admin | Updated: April 10, 2015 04:54 IST

नव्याने ताफ्यात आलेल्या बम्बार्डियर लोकलबाबत प्रवाशांच्या प्रतिक्रिया मिळविण्यासाठी एमआरव्हीसीचा (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आटापिटा

मुंबई : नव्याने ताफ्यात आलेल्या बम्बार्डियर लोकलबाबत प्रवाशांच्या प्रतिक्रिया मिळविण्यासाठी एमआरव्हीसीचा (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आटापिटा सुरू असून, त्यासाठी आता एम-इंडिकेटरचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या इंडिकेटरवर १0 एप्रिलपासून प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. एमआरव्हीसीमार्फत एमयूटीपी-२ अंतर्गत ७0 नव्या बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्यात येणार आहेत. याआधी दोन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आल्या असून, प्रवाशांच्या सेवेतही १५ मार्चपासून त्या दाखल झाल्या आहेत. चर्चगेट ते अंधेरी, बोरीवली, विरारपर्यंत या लोकल धावत आहेत. सध्या ताफ्यात आलेल्या नव्या लोकल प्रवाशांसाठी कितपत फायदेशीर ठरत आहेत हे बघण्यासाठी एमआरव्हीसीने प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १० प्रश्नांचा एक फॉर्म तयार करून तो एमआरव्हीसीने आपल्या वेबसाईटवर टाकला. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बम्बार्डियर लोकलमध्ये जाऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचाही निर्णय घेतला आणि त्यासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. ‘एम-इंडिकेटर’ या अ‍ॅपवरही प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचा निर्णय झाला आहे. १0 एप्रिलपासून (शुक्रवार) या इंडिकेटरवरही प्रतिक्रियांसाठी प्रश्नांचा फॉर्म उपलब्ध होणार आहे. तर शनिवारपासून सकाळी १0 ते दुपारी २ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत तो उपलब्ध होईल, असे एम-इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)