शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आता केळव्यात होणार विमाननिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 05:34 IST

भारतीय बनावटीचे सहाआसनी विमान बनवण्याचे कांदिवली येथील कॅप्टन अमोल यादव या वैमानिकाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

हितेन नाईक/निखिल मेस्त्री,

पालघर- भारतीय बनावटीचे सहाआसनी विमान बनवण्याचे कांदिवली येथील कॅप्टन अमोल यादव या वैमानिकाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. शासनाने केळवे (पूर्व) येथील किल्लेदार डेअरीची जागा त्याला विमाननिर्मितीसाठी देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.अमोल यादव याने आपले शिक्षण मुंबईतून पूर्ण करून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले. पुढे प्रगत वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याने अमेरिका गाठली. तिथे प्रशिक्षण घेत असताना विमाननिर्मितीचे धडेही त्याला मिळाले. आपण स्वत:ही विमानाची निर्मिती करू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा दिशेने त्याची धडपडणारी वाटचाल सुरू झाली. विमानाचा एकेक भाग जमवता जमवता त्याची खूप दमछाक होऊ लागली. तरीही, त्याने पाहिलेले स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. तब्बल सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जेट एअरवेजमध्ये वैमानिक असलेल्या अमोलने कांदिवली येथील आपल्या सुकांत सोसायटीच्या छतावर ळअउ-003 या सहाआसनी विमानाची निर्मिती केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (डीजीसीए) या सहाआसनी प्रवासी विमानाला मान्यता घेण्यासाठी अमोलला खूप अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, तिथेही त्याने हार न मानता मेक इन इंडियाअंतर्गत मुंबईत आयोजित केलेल्या ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रमात स्वत: तयार केलेले विमान ठेवले होते आणि उपस्थित देशी आणि परदेशी उद्योजकांचे त्याकडे लक्ष वेधून घेतले होते.>लहान शहरे जोडली जातीलभविष्यात उभे राहणारे हे १५ ते २० आसनी विमान देशांतर्गत दळणवळणासाठी फायदेशीर ठरणार असून याचा प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असेल. छोटेखानी विमान असल्यामुळे त्याद्वारे लहान शहरे जोडली जातील.- कॅ. अमोल यादव>स्थगिती आदेशाचा अडसरराज्य शासनाच्या मुख्य सचिवांमार्फत मे २०१६मध्ये ६ किंवा २० आसनी विमाननिर्मितीच्या कारखाना उभारणीसाठी २०० एकर जागेचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला होता. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्याने केळवे रोड येथे पूर्वेला १६० एकर जागा असल्याबद्दल कळवल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी त्या जागेची घोषणा केली. परंतु, त्याजागेसंदर्भात उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याने अमोल यादवच्या विमान उड्डाणाच्या केळवे येथील कारखाना उभारण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होऊ शकतो.>पंतप्रधानांकडून दखलत्याच्या या नावीन्यपूर्ण कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा घ्यावी लागली. फक्त सहाआसनी विमानाच्या निर्मितीपर्यंत आपले ध्येय न ठेवता पुढे अधिक प्रवासी आसन क्षमतेचे विमान बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची त्यांनी त्याला स्फूर्ती दिली. शासनपातळीवरून पूर्ण सहकार्य देण्याचे वचनसुद्धा दिले होते. त्यानुसार, अमोल यादव याच्या विमाननिर्मितीच्या प्रकल्पाला शासनाने केळवे रोड (पूर्व) येथील जागा देण्याचे जाहीर केले.