शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

कर्जमाफीनंतर आता अजेंडा समृद्धी महामार्गाचा

By admin | Updated: June 4, 2017 01:28 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २७ लाख शेतकऱ्यांना ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता राज्याच्या मागासलेल्या अशा विदर्भ

- यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २७ लाख शेतकऱ्यांना ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता राज्याच्या मागासलेल्या अशा विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीवर ते लक्ष केंद्रीत करणार आहेत. ४० हजार कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्यासाठी १० हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. राज्यातील आतापर्यंतच्या कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या मोबदल्यापेक्षा तो अधिक असेल. येत्या चार-पाच दिवसांत प्रत्येक गावातील संपादित करावयाच्या जमिनीचे दर शासन जाहीर करणार आहे. प्रकल्पग्रस्तांना पूर्ण मोबदला वा आंध्र प्रदेशातील अमरावती पॅटर्ननुसार लँड पुलिंग फॉर्मूल्याद्वारे प्रकल्पग्रस्तांना या महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या टाऊनशिपमध्ये पूर्णत: विकसित भूखंड देणे असे दोन्ही पर्याय शासनाने खुले ठेवले आहेत. येत्या अडीच ते तीन वर्षांत हा महामार्ग पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. समृद्धी महामार्गाला अनेक ठिकाणी विरोध असल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. वस्तुस्थिती मात्र तशी नाही. नाशिक जिल्ह्यातील १०० किलोमीटरच्या पट्टयात केवळ १५ किलोमीटरमधील गावांत विरोध आहे तर अमरावती जिल्ह्यातील केवळ १२ किमीच्या पट्टयात विरोधाचे सूर आहेत. आतापर्यंत शासकीय अधिकाऱ्यांनी (महसूल, बांधकाम, रस्ते विकास महामंडळ) यांनी तब्बल १५०० बैठकी घेऊन या महामार्गाबाबत लोकांचे समाधान केले. अनेक ठिकाणी शेतकरी जमिनी द्यायला स्वत:हून समोर आले ही मोठी उपलब्धी असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकमतला सांगितले. भूसंपादन हा सरकारचा अधिकार आहे पण लोकेच्छेच्या विरुद्ध तो वापरून प्रकल्पाची उभारणी करायची नाही, अशी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. त्यामुळे आणि प्रकल्पग्रस्तांशी संवादावर सर्वाधिक भर दिला, असे मोपलवार म्हणाले. म्हणून ‘समृद्धी’ला विरोध नाही?समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाचा फोकस कधी नव्हे तो विदर्भ व मराठवाड्यावर राहणार आहे. मुंबई, पुण्याच्या पट्टयात केंद्रीत झालेल्या औद्योगिक विकासाची दालने मागास भागांसाठी खुली होतील. मुंबईहून नागपूरला केवळ सहा तासात जाता येईल. त्या निमित्ताने राज्याच्या राजकारणाचा तों डावळा बदलेल. म्हणून तर काही नेते ‘समृद्धी’ंला विरोध करीत नाहीत ना, अशी चर्चा आहे. ‘लवासा’ सरकारने आपल्या नियंत्रणात घेतल्याने ‘समृद्धी’ला विरोध होत असल्याचा वॉटस् अ‍ॅप मेसेज सध्या जोरात आहे.५०० किमीचा महामार्ग मागास भागांतूनसमृद्धी महामार्गापैकी तब्बल ५०० किलोमीटरचा भाग हा विदर्भ (३५०किमी) आणि मराठवाड्यातील (१५० किमी) असेल. नाशिक जिल्ह्यातील १०० किमी, ठाणे ६८ तर अहमदनगर जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी ही २९ किलोमीटर इतकी असेल. या निमित्ताने नाशिकलाही जागतिक नकाशावर जाण्याची संधी आहे, असे राधेश्याम मोपलवार म्हणाले. मुंबई शहर व जिल्ह्यात आज नवीन उद्योग उभारणे, विस्तार करणे शक्य नाही. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, तळोजा, महाड, रोहा, पाताळगंगा या ठिकाणी नवीन उद्योग उभारण्यासाठी जागा शिल्लक नाही. पुणे परिसरातही अशीच परिस्थिती आहे. समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भात उद्योग उभे राहतील.