शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामांना नोटिसा

By admin | Updated: October 17, 2016 03:36 IST

दोन वेळा दुर्घटना झाल्याने शहरातील ओव्हरफ्लो झालेले राणा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आले आहे.

उल्हासनगर : दोन वेळा दुर्घटना झाल्याने शहरातील ओव्हरफ्लो झालेले राणा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आले आहे. तसेच त्याची पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. याच डम्पिंगशेजारील खुल्या भूखंडावर झोपडपट्टी तसेच व्यापारी गाळे अवैधरीत्या बांधले आहेत. हे डम्पिंग पुन्हा सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी या सर्व बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावल्या. राणा डम्पिंगशेजारील खुल्या भूखंडावर झोपडपट्टी व लांब व्यापारी गाळे उभे राहिले आहे. विनापरवाना व खुल्या भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यापारी गाळ्यांना पालिकेचा मालमत्ताकर लागू झालेला नाही. ज्यांना झाला, तो नाममात्र असून बनावट कागदपत्रे सादर करून मालमत्ताकर व्यापारी गाळ्यांना लावला आहे. नोटीस मिळाल्यानंतर एका महिन्यात मालमत्तेची कागदपत्रे प्रभाग अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहेत. या प्रकाराने भूमाफियांसह पालिका अधिकारी आणि राजकीय नेत्यांचेही धाबे दणाणले आहेत.>दुर्घटनेमुळे कचरा टाकण्यास स्थगितीउल्हासनगरातील कचरा म्हारळ गावाजवळील राणा डम्पिंग ग्राउंडवर १५ वर्षांपासून टाकला जात आहे. कचरा ओव्हरफलो होऊन दोन वेळा दुर्घटना झाल्याने स्थानिकांनी कचरा टाकण्यास मनाई केली. अखेर, राणा डम्पिंग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना घ्यावा लागला. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत कॅम्प नं-५ येथील खडी खदाण येथे कचरा टाकण्यात येत आहे. तेव्हापासून शहरातील ओला-सुका कचरा कॅम्प नं-५ येथील नव्या खडी खदाणीवर टाकला जात आहे. >पर्यायी जागेचा शोध राणा डम्पिंगशेजारील झोपडपट्टीमध्ये आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला असून प्रत्येक घरात एक जण आजारी असल्याचे उघड झाले आहे. पालिकेने यासाठी २४ बाय ७ दवाखान्याला मान्यता दिली आहे. मात्र, पालिका दवाखाना सुरू होण्यापूर्वी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पर्यायी जागेचा शोधही सुरू आहे. सध्या डम्पिंग जागेसाठी आलेल्या प्रस्तावावर पालिका निर्णय घ्ोणार आहे. पावसाळ्यात डम्पिंगवरील दुर्गंधयुक्त पाणी झोपडपट्टीत घुसत असल्याने आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच डम्पिंगच्या सपाटीकरणावर वर्षाला दीड कोटीचा खर्च केला जात आहे. मात्र, समस्या जैसे थे आहे.