शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

गोवा, महाराष्ट्र सरकारला हरित लवादाच्या नोटिसा

By admin | Updated: November 11, 2015 02:37 IST

तेरेखोल नदीतील गाळ उपसण्याच्या प्रश्नावर राष्ट्रीय हरित लवादाने गोवा व महाराष्ट्र सरकारसह दोन्ही राज्यांच्या सात यंत्रणांना नोटिसा बजावल्या आहेत.

पणजी : तेरेखोल नदीतील गाळ उपसण्याच्या प्रश्नावर राष्ट्रीय हरित लवादाने गोवा व महाराष्ट्र सरकारसह दोन्ही राज्यांच्या सात यंत्रणांना नोटिसा बजावल्या आहेत. २७ नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आली असून सर्व प्रतिवाद्यांना त्या दिवशी उपस्थित राहावे लागेल.यात किरणपाणी पोर्ट प्रा. लि., गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड तसेच वन खात्याचा समावेश आहे. आरोंदा जेटीसाठी तेरेखोल नदीच्या मुखावर गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांनी त्यास विरोध करून सुरुवातीला उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांच्याकडे धाव घेतली. गाड यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना काम रोखण्याचा आदेश दिला. त्यानंतर तेरेखोल ग्राम बचाव समितीने पंच सदस्य फ्रान्सिस रॉड्रिग्स यांच्या नेतृत्वाखाली हरित लवादाकडे धाव घेतली. ‘व्हाईट आॅर्किड इस्टेट प्रा. लि.’ तसेच ‘किरणपाणी पोर्ट प्रा. लि.’ या कंपन्यांना काम बंद करण्याचा आदेश दिला जावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. गोवा सरकार, गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र मरिटाइम बोर्ड आदींना या कामासाठी परवाने देऊ नयेत, असा आदेश जारी करावा, अशीही मागणी होती. तेरेखोल नदीपात्रात जहाजे, बार्ज, मोठ्या बोटींना परवानगी देऊ नये, अशीही मागणी होती.या प्रकरणी परवाने देण्याच्या बाबतीत अंतरिम स्थगितीची मागणी याचिकाकर्त्या समितीने केली असल्याचे वकिलाने स्पष्ट केले. सर्व सातही प्रतिवाद्यांना लवादाने नोटिसा बजावल्या आहेत. (प्रतिनिधी)