शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाकडून केवळ नोटिसांचा फार्स

By admin | Updated: July 15, 2016 21:24 IST

बीड जिल्हा रूग्णालयात साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाच पैकी चार रूग्णांची दृष्टी आधू झाली होती.

- व्यंकटेश वैष्णव 

बीड, दि. १५ -  बीड जिल्हा रूग्णालयात साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे व  डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाच पैकी चार रूग्णांची  दृष्टी आधू झाली होती. या प्रकरणात उशिराने जागे झालेल्या राज्य आरोग्य विभागाने केवळ डॉक्टरांना कारणे द्या नोटीस शुक्रवारी दिल्या आहेत. केवळ नोटिसांचा फार्स केल्याने कायमचे अंधत्व आलेल्या त्या रूग्णांची शासनाकडून अवहेलनाच होत आहे.नेत्रशस्त्रक्रिया शिबिरादरम्यान डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणावर चौकशी समितीनेही शिक्कामोर्तब केले होते. आॅपरेशन केलेल्या रूग्णांचे डोळे परत येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाचही रूग्णांना मुंबई येथील जेजे हॉस्पिटलला हालविले. उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाची आब्रू चव्हाट्यावर येईल. म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता. याबाबत ह्यलोकमतह्ण ने हे प्रकरण उजेडात आणले होते. मात्र या प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई झाली नव्हती.याप्रकरणी विश्वासनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनांमध्ये नांदेड येथील आ. अमर राजूरकर यांनी तारांकीत प्रश्न दाखल करताच  साडेतीन महिन्यात कुठलीच कारवाई न केलेले राज्य आरोग्य विभाग जागे झाले. शुक्रवारी बीड येथील नेत्र विभागातील डॉ. आर. आर. निरगुडे यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, वरिष्ठांकडून सदरील विषयाबाबत माहिती मागविली आहे.कायमचे अंधत्व आलेल्यांचे काय?जिल्हा रूग्णालय प्रशासन व संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अंधत्व आलेल्यांमध्ये धडधाकट महिला- पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबादारी आहे. त्यांना अद्याप शासनाने मदतीच्या रुपात फुटकी कवडीही दिली नाही. दृष्टी मागायला आले अन् आहे ती दृष्टी गमावून बसले, असा दुर्दैवी प्रसंग ओढावल्याने त्यांचे भवितव्य अंध:कारमय झाले आहे. त्यांची दृष्टी परत आणून देणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी उपस्थित केला आहे.यांना आले आहे कायमचे अंधत्व२१ एप्रिल २०१६ रोजी बीडच्या जिल्हा रूग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रीये दरम्यान  सुभद्रा भोसले (रा. माजलगाव), मालनबाई जगदाडे (रा. केज), भागूबाई विघ्ने (रा. माजलगाव), विठ्ठल कोल्हे (रा. डोंगरकिन्ही), भानूदास विघ्ने (रा. माजलगाव) असे दृष्टी अधू झालेल्या रूग्णांची नावे आहेत.