शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्त बँकांच्या ४३ अपात्र संचालकांना नोटिसा

By admin | Updated: February 4, 2016 04:24 IST

बरखास्त झालेल्या बँकांवरील अपात्र संचालकांच्या निवडीस प्रतिबंध करणाऱ्या वटहुकमाची अंमलबजावणी राज्यात जोरात सुरू करण्यात आली आहे

पुणे : बरखास्त झालेल्या बँकांवरील अपात्र संचालकांच्या निवडीस प्रतिबंध करणाऱ्या वटहुकमाची अंमलबजावणी राज्यात जोरात सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत ४३ अपात्र संचालकांना सहकार विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.बरखास्त केलेल्या सहकारी बँकांमधील संचालकांना पुन्हा कोणत्याही सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडीस दहा वर्षे प्रतिबंध करण्याची मागणी रिझर्व्ह बँकेकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. ती मान्य करून राज्य सरकारने याचा वटहुकूम काढला. सहकार विभागाने त्याची अंमलबजावणी सुरू केली. नोटिसा पाठविण्यात आलेल्यांमध्ये अजित पवारांसह विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, हसन मुश्रीफ, जयवंत पाटील, शिवाजीराव नलावडे, गणपतराव गावित, दिलीप देशमुख, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, शोभा बच्छाव, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, कोकणी परवेझ, संदीप गुळवे, शिरीषकुमार कोतवाल, जीवा पांडू गावित, धनंजय पवार, अदक्य हिरे, महोदव महाडिक, नरसिंग गुरुनाथ पाटील, पांडू शिंदे, पांडुरंग पाटील, विनय कोरे, राजू आवळे, अशोक तलाठी, निवेदिता माने, कृष्णराव पाटील, आनंदराव पाटील, नितीन पाटील, रामप्रसाद बोर्डीकर, संतोषकुमार कोरपे, श्रीनिवास देशमुख, रवींद्र देशमुख, शिरीषकुमार स्वरूपसिंग नाईक, चंद्रकांत रघुवंशी, श्यामकांत सनेर, भरत माळी, राजवर्धन कदमबांडे, प्रभाकर चव्हाण, दीपक पाटील आदींचा समावेश आहे.या कायद्यानुसार अपात्र संचालक कोणत्याही जिल्हा बँका, राज्य बँक आणि नागरी सहकारी बँकांच्या संचालकपदी असतील, तर त्यांना ती पदे सोडावी लागणार आहेत. २१ जानेवारी २००६ नंतर राज्यात ६० नागरी सहकारी बँका, कोल्हापूर, सांगली, नाशिक, धुळे-नंदूरबार आणि बीड या ५ जिल्हा बँका आणि राज्य बँक अशी एकूण ६६ संचालक मंडळे बरखास्त झाली. या सर्व संचालक मंडळातील कोणी सध्या इतर बँकांवर कार्यरत असेल, तर त्यांना या पदावरून कमी केले जाणार आहे. (प्रतिनिधी)