शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची सूचना हायकोर्टाने फेटाळली

By admin | Updated: March 4, 2016 03:18 IST

बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी सामान्यांनी न्यायालयाची पायरी न चढता, पक्ष कार्यालयात तक्रार करण्याची सूचना शिवसेनेने उच्च न्यायालयात केली.

मुंबई : बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी सामान्यांनी न्यायालयाची पायरी न चढता, पक्ष कार्यालयात तक्रार करण्याची सूचना शिवसेनेने उच्च न्यायालयात केली. मात्र, शिवसेनेची ही सूचना उच्च न्यायालयाने धुडकावून लावली. पक्ष कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवणे, हे सामान्य माणसासाठी सोपे आहे, असे तुम्हाला वाटते का? असे म्हणत, उच्च न्यायालयाने शिवसेनेचे आवाहन मान्य करण्यास नकार दिला.बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी अनेक वेळा नोटीस बजावूनही वर्षभर जाग न आलेल्या शिवसेनेने गेल्या सुनावणीपासून उच्च न्यायालयात आपला वकील उपस्थित केला. बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी आपली स्वत:ची यंत्रणा असल्याचे शिवसेनेने उच्च न्यायालयात सांगितले. मात्र, ती यंत्रणा काय आहे, याबाबत शिवसनेने न्यायालयाला काहीच सांगितले नाही. गुरुवारच्या सुनावणीवेळी शिवसेनेचे वकील अ‍ॅड. विश्वजित सावंत यांनी बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी सामान्यांनी न्यायालयाची पायरी न चढता पक्ष कार्यालयात तक्रार करावी. पक्षाने कारवाई केली नाही, तर महापालिकेने कारवाई करावी, अशी सूचना न्या. अभय ओक व न्या. शालिनी फणसाळकर- जोशी यांच्या खंडपीठाकडे केली.‘होर्डिंगविषयी राजकीय नेत्यांना काही माहीत नसते, असे तुम्हाला वाटते का? इथे महापालिका अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची गरज भासते. मग सामान्य माणसांची काय तऱ्हा? अशा शब्दांत शिवसेनेला चपराक लगावत, खंडपीठाने सेनेची सूचना धुडकावून लावली.दरम्यान, देवनार येथील बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी खंडपीठाने शुक्रवारी देवनार पोलीस स्टेशनचे इनचार्ज व तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.‘मारहाण प्रकरणी अज्ञात लोकांच्याविरुद्ध देवनार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांबरोबर दोन पोलीस संरक्षणासाठी पाठवावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.मात्र, या वेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्याबरोबर पोलीस नव्हते,’ असे महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी खंडपीठाला सांगितले. ‘असे असेल, तर ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. देवनार पोलीस ठाण्याचे इनचार्ज आणि तपास अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे,’ असा आदेश खंडपीठाने दिला. (प्रतिनिधी)