शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
3
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
4
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
5
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
6
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
7
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
8
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
9
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
10
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
11
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
12
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
13
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
14
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
15
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
16
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
17
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
18
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
19
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
20
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटिसा

By admin | Updated: May 17, 2016 04:12 IST

जोशीबाग परिसरातील आशीर्वाद या जीर्ण झालेल्या इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले

कल्याण : जोशीबाग परिसरातील आशीर्वाद या जीर्ण झालेल्या इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले असून पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यास सुरूवात झाली आहे. तातडीने घरे रिकामी करा, अन्यथा दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, अशा सूचना नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी पुन्हा जोशीबागेतील एका इमारतीत छताचे प्लॅस्टर कोसळले.धोकादायक इमारतींचा यंदाचा आकडा ६८६ असून यात २८९ इमारती या अतिधोकादायक आहेत. संबंधित इमारतींना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार दरवर्षी पार पाडले जातात. जीर्ण अवस्थेतील इमारती तातडीने तोडा, असे आदेशही जारी केले जातात. परंतु यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)>नागरिकांची भूमिका, प्रशासनाचा ढिलेपणा येतो कारवाईच्या आडजोशी बागेतील आशीर्वाद इमारतीची गॅलरी कोसळल्याच्या घटनेने पुन्हा एकदा जीर्ण अवस्थेतील इमारतींचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीच्या आठ प्रभागांपैकी सर्वात जास्त धोकादायक बांधकामे कल्याणमधील क प्रभागात आहेत. तेथे २१४ बांधकामे धोकादायक असून यातील १३४ बांधकामे अतिधोकादायक आहेत. मोठ्या प्रमाणावर रहिवाशी असलेल्या ठिकाणी कारवाईत अडचणी येत आहेत. काही बांधकामांचे वाद न्यायप्रविष्ट असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. तीन महिन्यात येथील दोन इमारती तोडल्या, तर महिनाभरात जीर्ण अवस्थेतील चार ते पाच इमारतींवर हातोडा चालवला जाणार आहे.