शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षण संचालकांना नोटीस

By admin | Updated: January 17, 2016 02:25 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न झाल्यामुळे, दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे

औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न झाल्यामुळे, दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. पी.आर. बोरा यांनी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिंगारे आणि सोलापूर येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी अनियमितता होऊ नये, पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता डावलून इतरांना प्रवेश दिले जाऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश आहेत. त्यांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात ‘अवमान याचिका’ दाखल करण्याची मुभा आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या एमएचसीईटी २०१५ या सामायिक परीक्षेनंतर वैद्यकीय शिक्षण संचालकांनी २२ सप्टेंबर २०१५ रोजी राज्यातील रिक्त जागांची परिस्थिती, संबंधित महाविद्यालयांची नावे, प्रवेश पद्धती जाहीर केली. २३ ते २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत होती. अंकिता चव्हाणला एमएचसीईटीमध्ये १६१ गुण मिळाले होते. तिने २४ सप्टेंबरला सोलापूर येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केला. २६ सप्टेंबरला संचालकांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात १६४ गुण प्राप्त केलेल्या माधुरी जाधवचे नाव जाहीर केले, परंतु तिने त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला नसल्याने ती जागा रिक्त राहिली. त्या जागेवर गुणवत्तेनुसार १६१गुण प्राप्त केलेल्या अंकिताऐवजी जी विद्यार्थिनी प्रवेश प्रक्रियेत सहभागीच झाली नाही, अशा रोहिणी राठोडला प्रवेश दिला, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)तक्रार केली पण दखल नाही- अंकिताने या संदर्भात ३० सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे तक्रार केली, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून अंकिताने अ‍ॅड. सुनील विभुते यांच्यामार्फत खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. याचिकेची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे.