शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

पालिकेने तबेला मालकांना पाठवल्या नोटीस

By admin | Updated: May 21, 2016 05:38 IST

पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो, कावीळ असे आजार वाढतात.

मुंबई : पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो, कावीळ असे आजार वाढतात. गेल्या वर्षी मुंबईत लेप्टो अचानक वाढला होता. पावसाळा सुरू झाल्यावर आजारांवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिका मे महिन्यातच कामाला लागली आहे. मुंबईतील तबेला मालकांना त्यांनी नोटीस पाठविली असून गाय, म्हैस यांचे उपचार करून घेण्यास सांगितले आहेत. त्याचबरोबर मलेरियाला आळा घालण्यासाठी डास उत्पत्तीक्षेत्रांचा शोध सुरू केला असल्याची माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. गेल्या वर्षी पावसाळ्यात लेप्टोचे १८ बळी गेले होते. त्यानंतर लेप्टो का वाढला, याचे संशोधन पालिकेने केले होते. या संशोधनात लेप्टो हा फक्त उंदरांमुळे नाही, तर गाय, म्हैस, डुक्कर आणि कुत्रा यांच्यामुळेही होऊ शकतो असे निदर्शनास आले होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लेप्टोला आळा घालण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पालिकेने मुंबईतील तबेला मालकांची बैठक घेतली होती. त्यात त्यांना प्राण्यांचे उपचार करून घ्या, असे सांगण्यात आले होते. प्राण्यांचे फक्त लसीकरण करून उपयोगाचे नाही. त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच पावसाळ्याआधी प्रत्येक तबेला मालकाने प्राण्यांवर उपाचर करून घेतल्याचा दाखला महापालिकेकडे द्यायचा आहे. तर पाळीव कुत्र्यांवरही उपचार करून घेण्यास त्यांच्या मालकांना कळवण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्यावर साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. पाणी साचण्याची ठिकाणे शोधून काढली आहेत. बांधकामाच्या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे. खासगी क्षेत्रातही पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर स्वच्छता केली की नाही, याचीही पाहणी केली जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे डॉ. केसकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) >बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची १ ते १५ जून दरम्यान तपासणी करून घ्या, असे पालिकेने आदेश दिले आहेत. तिथल्या कामगारांना मलेरिया अथवा डेंग्यू झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.