शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली एमआयडीसीला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 03:58 IST

प्रदूषणामुळे शहरातील रासायनिक कारखाने बंद असतानाही सोमवारी रसायनमिश्रित पाण्याने रामचंद्र नाल्याचा रंग लालभडक झाला.

डोंबिवली : प्रदूषणामुळे शहरातील रासायनिक कारखाने बंद असतानाही सोमवारी रसायनमिश्रित पाण्याने रामचंद्र नाल्याचा रंग लालभडक झाला. त्यातून पसरणाऱ्या वायुंमुळे अनेक नागरिकांना त्रास झाला. या घटनेची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी तातडीने पाहणी केली. यावेळी कंपन्यांच्या फुटलेल्या सांडपाण्याच्या वाहिन्या, त्यांचे तुडुंब भरून वाहणारे चेंबर असे चित्र दिसून आले. या प्रदूषणाकडे एमआयडीसीने दुर्लक्ष केल्याने मंडळाने एमआयडीसीला नोटीस बजावली आहे. ठराविक काळात दुरुस्ती व देखभाल करून पायाभूत सोयी-सुुविधा पुरावा, अशी सूचना या नोटिशीत केली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी मंगळवारी रामचंद्र नाल्याची पाहणी केली. या नाल्यात कुठून व कोणत्या कारखान्यातून पाणी सोडले जाते, याचा शोध घेतला. सोनारपाडा येथील कापड उद्योग कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिन्या फुटल्या आहेत. त्याचे पाणी थेट नाल्यात मिसळत आहे. त्याचबरोबर वाहिनाला जोडलेले चेंबर टेम्पो नाका येथे तुडुंब भरून वाहत असल्याची परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी एमआयडीसीला जाब विचारला. दुर्गुले यांनी सांगितले की, राष्ट्रीय हरित लवादाकडे असलेल्या ‘वनशक्ती’च्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मंडळाने २ जुलैला डोंबिवलीतील ८६ रासायनिक कारखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे या कारखान्यातून सांडपाणी नाल्यात सोडले जात नाही. कापड उद्योग प्रक्रिया कारखाने सुरू आहेत. त्यातून तयार होणारे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली आहे. त्यामुळे हे पाणी नाल्यात मिसळून नाल्याच्या पाण्याचा रंग लाल झाला होता. सांडपाणी प्रक्रिया केंद्र व सांडपाणी वाहून नेणारी वाहिनीची दुरुस्ती, देखभाल व एमआयडीसी परिसरातील कारखानदारांना पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. एमआयडीसीने प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेऊन थेट खाडीत दूरवर सोडण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेला ४५० कोटींचा खर्च येणार आहे. परंतु, त्यासाठी राष्ट्रीय सागरी संस्थेकडे परवानगी घ्यावी लागते. हा प्रकल्प खर्चिक असल्याने तो पूर्णत्वास येऊ शकत नाही. त्यासाठी निधी कुठून आणणार, असे कारण एमआयडीसीने राष्ट्रीय हरित लवादाकडे दिले होते. परंतु, लवादाने एमआयडीसीचे कारण ग्राह्य धरलेले नाही. काही झाले तरी एमआयडीसीला हे काम करावेच लागेल, असे लवादाने स्पष्ट केले होते. >सुनावणी २३ ला कारखानदारांनी बंद कारखान्याच्या नोटिशीला लवादाने स्थगिती द्यावी, यासाठी केलेल्या याचिकेवर लवादासमोर २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तर ‘वनशक्ती’च्या याचिकेवर १ आॅक्टोबरला सुनावणी अपेक्षित आहेत.