शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूग्रस्त १२ जिल्ह्यांना नोटिसा

By admin | Updated: November 5, 2014 04:17 IST

राज्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या उच्चाटनासाठी काम न करणा-या अधिका-याना फैलावर धरले आहे

पुणे : राज्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या उच्चाटनासाठी काम न करणा-या अधिका-याना फैलावर धरले आहे. उद्रेक झालेल्या १२ जिल्ह्यांतील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना आरोग्य विभागाने तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने हिवताप विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन डेंग्यूच्या स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये १२ जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना डासांचा नायनाट करण्यासाठी आणि डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले होते. कामात कुचराई केल्याचे दिसून आल्याने डॉ. जगताप यांनी तातडीने चंद्रपूर, पुणे, बीड, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, भंडारा, गोंदिया, ठाणे, सातारा, अमरावती, रायगड या १२ जिह्यांतील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये योग्य काम होत नसल्याचे दिसून आले. डेंग्यू वाढण्यामागचे हे एक कारण असल्याने त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिशींवर त्यांचा समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.राज्यात गेल्या ३ महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या ६ महिन्यात राज्यात डेंग्यूचे तब्बल ३ हजार ५६५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे.