शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

हमालांना चार लाख वेतन, केंद्र शासनाला नोटीस

By admin | Updated: December 4, 2014 00:39 IST

वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे फूड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे हमाल दर महिन्याला चार लाख रुपयांवर कमाई करीत असल्यामुळे सार्वजनिक निधीचे प्रचंड नुकसान होत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्ट : ७ जानेवारीपर्यंत मागितले प्रतिज्ञापत्रनागपूर : वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे फूड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे हमाल दर महिन्याला चार लाख रुपयांवर कमाई करीत असल्यामुळे सार्वजनिक निधीचे प्रचंड नुकसान होत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र शासनासह अन्य सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून ७ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत.याप्रकरणाची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. न्यायालयीन मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी नियमानुसार तयार केलेली याचिकेची प्रत न्यायालयासमक्ष सादर केली आहे. याचिकेत केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव, एफसीआयचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक, महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि महाराष्ट्र माथाडी हमाल मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. नागपूर येथील फूड कार्पोरेशन आॅफ इंडियातील कामगारांची संघटना शक्तिशाली आहे. संघटनेने संपाची भीती दाखवून हमालांचे वेतन व इतर भत्ते अव्वाच्यासव्वा वाढवून घेतले आहेत. यामुळे शासकीय निधीचे नुकसान होत आहे. अधिकारी यासंदर्भात मूग गिळून गप्प आहेत. चांगली कमाई करणारे हमाल सात ते आठ हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे भाड्याने कामगार आणतात. वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे हमालांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. यामुळे त्यांचे वेतन लाखो रुपयांनी वाढते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)याचिकेतील विनंती१) एफसीआय गोदामांवर धाड टाकून हमालाच्या वेतनाची कागदपत्रे जप्त करण्यात यावी.२) भाड्याच्या कामगारांना गोदामात प्रवेश देण्यात येऊ नये. ३) दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.४) गोदामात बायो-मेट्रिक मशीन लावण्यात यावी. ५) प्रोत्साहनपर भत्त्याचा नियम रद्द करण्यात यावा.६) प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करावी.