शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वनसचिवांना तुरुंगात टाकण्याची नोटीस

By admin | Updated: September 9, 2015 01:09 IST

वारणसी आणि कन्याकुमारी यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्र. ७ चा नागपूरजवळील मनसर आणि खवासा या दरम्यानचा भाग रुंद करण्याच्या कामासाठी बोगरा

मुंबई : वारणसी आणि कन्याकुमारी यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्र. ७ चा नागपूरजवळील मनसर आणि खवासा या दरम्यानचा भाग रुंद करण्याच्या कामासाठी बोगरा व पवनी वनक्षेत्रांतील झाडे तोडण्याचा आदेश झुगारून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केल्याबद्दल महाराष्ट्राचे वन सचिव व मुख्य वनसंरक्षकांना तुरुंगात टाकून त्यांच्या मालमत्ता जप्त का करू नयेत, अशी नोटिस राष्ट्रीय हरित लवादाने काढली आहे.झाडे न तोडण्याचा आदेश ५ आॅगस्ट रोजी देऊनही २६ आॅगस्टपासून त्या ऊागात महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यात आल्याचे पुरावे सादर केले गेल्यानंतर न्यायाधिकरणाने वन सचिव, मुख्य वनसंरक्षख आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राज्यातील महाव्यवस्थापकांना न्यायालयीन अवमानना कारवाईची (कन्टेम्प्ट) नोटीस काढली आहे. त्यात या अधिकाऱ्यांकडे, तुम्हाला तुरुंगात पाठवून मालमत्ता का जप्त करू नये, याचा खुलासा १४ सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आला आहे.तसेच संदर्भित भागातील महामार्गालगतची झाडे यापुढे तोडली जाणार नाहीत याची खात्री करण्यास नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना व नागपूर परिमंडळाच्या पोलीस महानिरीक्षकांना सांगण्यात आले असून त्याचे पालन न झाल्यास तुम्हाला व्यक्तिश: जबाबदार धरण्यात येईल, असेही न्यायाधिकरणाने त्यांना बजावले आहे.महामार्गाची दुरुस्ती आणि विस्तारीकरण यासाठी ज्या भागातील जंगल तोडण्यात येत आहे तो भाग पेंच, कान्हा आणि नागझिरा या तीन व्राघ्र अभयारण्यांची सलगता कायम राखण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या डिसेंबरमध्ये हे काम सुरु करण्यास परवानगी दिली तर केंद्र सरकारने ४९.२४६ हेक्टरचे क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याची अनुमती दिली.श्रृष्टी पर्यावरण मंडळ, कॉन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट व अमरावती येथील नेचर कॉन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन सोसायटी यांनी या विरोधात केलेल्या याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिरणात प्रलंबित आहेत. त्यातच झाडे तोडण्यास मनाई करणारा आदेश ५ आॅगस्ट रोजी दिला गेला होता. तरीही झाडे तोडली जात असल्याने श्रृष्टी पर्यावरण मंडळाने अ‍ॅड. ऋत्विक दत्त यांच्यामार्फत न्यायाधिकरणात ‘कन्टेम्प्ट’साठी अर्ज केला. त्यावर न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार व सदस्य एम. एस. नाम्बियार, डॉ. डी. के. अग्रवाल व प्रा. ए.आर. युसूफ यांच्या न्यायपीठाने वरील आदेश दिले. या कामासाठी सुमारे ३० हजार झाडांची कत्तल केली जाणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे असे की, हा भाग व्याघ्र प्रकल्पात मोडत असल्याने, सर्वोच्च न्यायालायने डिसेंबर २००६ मध्ये गोवा फौंडेशनच्या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची संमती घेतल्याशिवाय तेथे कोणतेही वनेतर काम करणे निषिद्ध आहे. अशी संमती न घेताच काम सुरु केले आहे.