शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार

By admin | Updated: November 11, 2016 06:20 IST

राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांत इतर बँकांप्रमाणेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार असून, खातेदारांना आपल्या खात्यात या नोटा भरता येतील

पुणे/ मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांत इतर बँकांप्रमाणेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार असून, खातेदारांना आपल्या खात्यात या नोटा भरता येतील, असा निर्णय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे. मात्र, पतसंस्थांना हा निर्णय लागू नसल्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले. पैसे बदलून देण्यास खासगी व सरकारी बँकांत सुरुवात झाली. मात्र, त्यात आरबीआयने जिल्हा बँकांचा समावेश यात केला नव्हता. गुरुवारी अनेकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये गर्दी केली होती. ही बाब सहकार आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर आरबीआयशी संपर्क साधला. आरबीआयने गुरुवारी सुधारित पत्रक काढत जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे बदलून देण्याची मुभा दिली. (प्रतिनिधी)पतसंस्थांना परवानगी नाहीराज्यातील पतसंस्थांना अजूनही पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारता येणार नाहीत. राज्यात पंधरा हजार पतसंस्था आहेत. त्यांनाही नोटा बदलून देण्यास परवानगी दिल्यास अधिक नागरिकांपर्यंत पोचता येईल. तसेच या यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर मदत होईल. पतसंस्थांना अशी परवानगी दिल्यास इतर बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होईल. तशी मागणी आरबीआयकडे करण्यात आली असल्याची माहिती दळवी यांनी दिली. नामोल्लेख नसल्याने झाली पंचाईतराज्यातील ३१ जिल्हा बँकांच्या 3746 शाखा गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्यानंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. काही जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारून त्याबदल्यात नव्या नोटा ग्राहकांना देऊ केल्या. स्पष्ट आदेश नसल्याने काही जिल्हा बँकांनी राज्य शिखर बँकेशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले. जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात जिल्हा बँकांचा नामोल्लेख नसल्याचे कळवले.केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात जिल्हा बँकांचा उल्लेख नसल्याचे कारण पुढे करत, या बँकांनी नोटा स्वीकारू नयेत, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार राज्य शिखर बँकेने तसा ई-मेल सर्व जिल्हा बँकांना पाठविला. त्यानंतर व्यवहार थांबविण्यात आले. मात्र, दुपारनंतर त्यात दुरुस्ती झाली.