शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदी : जेवण करा, पैसे जमेल तेव्हा द्या

By admin | Updated: November 15, 2016 20:10 IST

चलनातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांचीही तारांबळ उडली आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 15 -  चलनातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांचीही तारांबळ उडली आहे. सुट्या पैशांचा अभावातून नवीन आलेली दोन हजार रुपयांची नोटही कोणी घेईना, अशातच खाण्या-पिण्याची अबाळ होणे ही प्रत्येकांची सामूहिक समस्या झाली होती. परंतु, मुंबई आग्रा हायवेवरील दहावा मैल परिसरातील हॉटेल रिलॅक्स कॉर्नरच्या मालकांनी या सामूहिक समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांप्रती सहानुभूती दाखवत ‘हजार, पाचशेच्या नोटांची चिंता सोडा, जेवण करा आणि पैसे तुम्हाला जमेल तेव्हा द्या’ असे फलक लावले आहे. 
मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रिलॅक्स शाकाहारी फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचा, डेबीट, क्रेडीट कार्डने बील देण्याचा पर्याय उपलबद्ध असतानाही हॉटेलच्या संचालकांनी प्रवासातील नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे. प्रवासात असणाºया नागरिकांनी सुटे पैसे नाहीत म्हणून कोणताही विचार न करता येथे पोटभर जेवन करा आणि पुन्हा या मार्गावरून परताना पैसे द्या, असे आवाहन हॉटेलच्या संचालकांनी केले आहे. हॉटेलचा हा निर्णय कौतुकास्पद असून सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली नाही तर नवलच! केवळ जून्या नोटेमुळे कोणी उपाशी राहू नये, हा साधा विचार या हॉटेलने केला आहे. त्यामुळे अनेकांची किमान जेवणाची समस्या तरी दूर झाली. गेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून या नोटा चलनातून बाद झाल्याने व्यवसायिकांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. पण नंतर राज्यसरकारने आदेश दिल्यानंतर काही ठिकाणी नोटा स्विकारल्या जात असल्या तरी सर्वसामान्य प्रवास्यांची समस्या दूर करण्यासाठी अशाप्रकारे समाजातील विविध घटकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे. 
 
ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा आहेत त्यांनी जेवणाची चिंता करू नये. निसंकोच मनाने जेवण करून घ्यावे अणि पुढच्या वेळी बिलाचे पैसे द्यावे. ज्यांच्याकडे मोठ्या रकमेच्या नोटा आहेत. त्यांचा प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ज्यांच्याकडे जुन्या नोटा आहेत. ते प्रवासी संकोच करतात. म्हणून आम्ही असे फलक लावून आवाहन केले आहे. व्यवहार महत्वाचा असला तरी शेवटी माणूसच माणचाच्या कामी येणार नाही तर मग कोण येणार
-  भीमाबाई जोंधळे,संचालक, हॉटेल रिलॅक्स कॉर्नर, दहावा मैल.