शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या नव्हे, खून केल्याचा आरोप

By admin | Updated: December 26, 2016 19:53 IST

हतनूर कॉलनीतील युक्ता चेतन सोनार (वय २४) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दुसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 26 - हतनूर कॉलनीतील युक्ता चेतन सोनार (वय २४) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दुसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. ही आत्महत्या नसून खूनच असल्याचा आरोप करुन दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. चार तासाच्या गोंधळानंतर इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी युक्ताचा मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी विवाहितेचा पती, सासू, सासरा व मामसासरा या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.युक्ता सोनार यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली होती. गळफास घेतल्याच्या संशयावरुन प्रथमदर्शनी या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री विवाहितेचा पती चेतन सोनार व त्याचा मामा कांतीलाल सोनार या दोघांना जिल्हा रुग्णालयात मारहाण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीही नऊ वाजेपासून नातेवाईकांनी युक्ताचा पती व सासरच्यांना रुग्णालयात बोलवा, पतीच्याच हस्ते अग्निडाग देऊ, अशी भूमिका घेतल्याने वातावरण चिघळले होते.वातावरण चिघळल्याचे पाहून रामानंद नगर, जिल्हा पेठ, जळगाव शहर व निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सहायक निरीक्षक अरविंद भोळे, सारिका कोडापे यांनी नातेवाईकांची समजूत घातली, मात्र जळगावात शवविच्छेदनास त्यांनी नकार दिला. दोरीने गळा आवळून युक्ताचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत होता. त्यामुळे वातावरण तापले. डॉक्टरांकडून शवविच्छेदनास नकारपोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी पुन्हा नातेवाईकांशी चर्चा करून समजूत घातली. त्यानंतर जळगावातच शवविच्छेदनाचा निर्णय झाला, परंतु नातेवाईकांकडून डॉक्टरांवरही आरोप होण्याच्या भीतीने डॉक्टरांनी जळगावात शवविच्छेदन करण्यास नकार दिला, त्यामुळे धुळे येथे मृतदेह रवाना करण्यात आला. मृतदेहासोबत काही कर्मचारी पाठविण्यात आले.आरोप होऊ नये म्हणून डॉक्टरांनीही जळगावात शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याकडून लेखी घेतल्यानंतर मृतदेह धुळे येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.-प्रवीण वाडिले, पोलीस निरीक्षक