शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसाठी ‘एनए’ नाही

By admin | Updated: January 21, 2016 04:06 IST

राज्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणून नागरी क्षेत्रातील विकास योजनेतील (डीपी) जमिनीवर अथवा शेतजमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बिनशेती परवानगीची अट शिथिल करण्यात

मुंबई : राज्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणून नागरी क्षेत्रातील विकास योजनेतील (डीपी) जमिनीवर अथवा शेतजमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बिनशेती परवानगीची अट शिथिल करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.विकास योजनेतील बिनशेतीसाठी आरक्षित असलेल्या जमिनीसाठी बिनशेती वापरासाठी परवानगीची आवश्यकता नसल्याची तरतूद राज्य शासनाने डिसेंबर २०१४ मध्ये केली होती, पण या निर्णयाची अंमलबजावणी करताना विभागीय पातळीवर अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी अंमलबजावणीची पद्धत सुटसुटीत करण्यात आलेली आहे.बिनशेती परवान्यातून सूट मिळविण्यासाठी जमीन वर्ग १ ची (शेतजमीन) आहे की, वर्ग २ ची (विकास आराखड्यातील) आहे, याबाबत कोणत्या महसूली अधिकाऱ्याकडून दाखला घ्यावा याबाबत जनतेत संभ्रम होता. नव्याने काढलेल्या निर्णयानुसार अर्जदाराने संबंधित तहसिलदाराकडे अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत तहसिलदारास जमीन वर्ग १ की २ याबाबतचा दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जदाराने हा दाखला नियोजन प्राधिकरणाकडे दिल्यानंतर जमीन जर वर्ग १ ची असेल तर बिनशेती परवान्याची आवश्यकता भासणार नाही.मात्र, जमीन वर्ग २ ची असल्याचे निष्पन्न झाल्यास अर्जदारास नियमानुसार देय नजराणा रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात भरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून ३० दिवसांत ना-हरकत दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा ना-हरकत दाखला नियोजन प्राधिकरणाकडे दाखल केल्यावर बिनशेती परवानगी घेण्याची आवश्यकता यापुढे रहाणार नाही. ३० दिवसांच्या विहित मर्यादेचा भंग करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)> या निर्णयामुळे उद्योजकांची डोकेदुखी टळणार असली तरी शेतजमिनीचा मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जाण्याचा धोकाही नाकारता येत नाही.> ना-हरकत प्रमाणपत्र देणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांना ‘डाटा बँक’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एक ‘विशेष कक्ष’ स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती खडसे यांनी या वेळी दिली.