शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 3 जुलै रोजी पुन्हा "नॉट इन माय नेम"

By admin | Updated: July 1, 2017 12:20 IST

28 जून रोजी झुंडशाही विरोधात देशभरातील विविध शहरांमध्ये निदर्शने केल्यानंतर आता तीन जुलै रोजी मुंबईमध्ये पुन्हा नॉट इन माय नेम ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.1- 28 जून रोजी झुंडशाही विरोधात देशभरातील विविध शहरांमध्ये निदर्शने केल्यानंतर आता तीन जुलै रोजी मुंबईमध्ये पुन्हा "नॉट इन माय नेम" ही निदर्शने करण्यात येणार आहेत.  सोमवार 3 जुलै रोजी दुपारी चारनंतर दादर येथील वीर कोतवाल उद्यानापासून चैत्यभूमीपर्यंत हा झुंडशाहीविरोधात निषेध व्यक्त केला जाणार आहे. 
नवी दिल्लीमधून हरियाणामध्ये जाणाऱ्या जुनैद खानची जमावातर्फे हत्या करण्यात आल्यानंतर याबद्दल समाजातील विविध घटकांमधून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. दिल्लीमधील चित्रपट निर्माते राहुल रॉय आणि त्यांची पत्नी सबा दिवान यांनी याबाबत दिल्लीमधील जंतरमंतर येथे निदर्शने करण्याचा संकल्प फेसबूकवर व्यक्त केला होता. त्याला देशभरातून आणि देशाबाहेरही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 28 जून रोजी नवी दिल्लीसह देशातील बंगळुरु, मुंबई, कोलकाता तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये ही निदर्शने करण्यात आली. मुंबईमध्ये वांद्रे येथील कार्टर रोड येथे सुमारे 1000 नागरिकांनी एकत्र येऊन नॉट इन माय नेम लिहिलेले फलक उंचावून निषेध व्यक्त केला होता. आता सोमवारी पुन्हा दादर येथे ही निदर्शने करण्यात येणार आहेत.
नॉट इन माय नेम निदर्शनांमध्ये मी का सामील झालो ? - हरिश सदानी, मेन अगेन्स्ट वूमेन अब्यूज
2015 साली दादरीमध्ये अखलाखला त्याच्या घरामध्ये बीफ असल्याचा संशय घेऊन जमावाने ठार मारले. त्यानंतरही बीफ असल्याचा संशय घेऊन जमावाने कायदा हातात घेऊन हत्या करण्याच्या काही घटना घडल्या. आता जुनैदची हत्या झाल्यानंतर सबा दिवानने फेसबुकवर याबाबत संताप व्यक्त करत झुंडशाहीचा निषेध करण्याचे ठरवले. नॉट इन माय नेम या नावाने सुरु झालेले हे आंदोलन देशात आणि देशाबाहेर पसरले. सोशल मीडियावर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतील कार्टर रोड येथे आम्ही जमण्याचे ठरवले. समाजातील विविध स्तरातील लोक यामध्ये सामील झाले होते. जर सामान्य लोक स्वतःहून या निदर्शनांमध्ये सामील होतात तर आपण का मागे राहावे अशीच भावना यामध्ये सहभाग घेताना आमची होती. चित्रपट निर्माते, पत्रकार, कलाकार, महाविद्यालयीन तरुण असे विविध क्षेत्रातील लोक तेथे आले होते. कल्की कोचलिन, शबाना आझमी, रजत कपूर, आनंद पटवर्धन यांनीही यावेळेस उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. सर्वांनी नॉट इन माय नेमचे फलक हातात घेऊन रिंगण केले, तसेच गाण्यांद्वारेही आपला निषेध व्यक्त केला. यावेळेस कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही.  कदाचित याचाच परिणाम म्हणून किंवा देशभरातून उमटणाऱ्या निषेधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परवा गोरक्षणाखाली होणाऱ्या हत्यांबाबत बोलावे लागले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर बोलताना जुनैदचा भाऊ हाश्मीने व्यक्त केलेले मत बरेच काही सांगून जाते. पंतप्रधानांनी हे वक्तव्य करण्यास फारच उशीर झाला आहे, त्यांच्या मनात आले तर हे प्रकार एका दिवसात थांबतील असे त्याने मत व्यक्त केले आहे.