चोंढी (अलिबाग) : राज्यातील भाजपा सरकारला पाठिंबा देण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही. सरकारने वादग्रस्त विषयांत लक्ष घातले नाही, तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे सांगत राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अवघ्या २४ तासांच्या आत घूमजाव केले. ‘सरकार पाडापाडीत आम्हाला रस नाही. आपण काल जे काही बोललो त्याचा अर्थ आपण सरकार पाडायला निघालो असा होत नाही’, अशी नेमकी उलटी भूमिका त्यांनी आज मांडल्याने राष्ट्रवादीचे नेतेही चक्रावून गेले!राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वेध भविष्याचा’ या दोन दिवशीय बैठकीच्या उद्घाटन सत्रात मंगळवारी पवारांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे सूतोवाच करीत निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यावरून राजकीय क्षेत्र ढवळून निघालेले असतानाच बुधवारी याच बैठकीचा समारोप करताना पवारांनी नेमकी उलटी बाजू मांडत कालच्या विधानाची सावरासावर केली. (विशेष प्रतिनिधी)
पाडापाडीत रस नाही!
By admin | Updated: November 20, 2014 04:00 IST