शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच विवाहपूर्व लैंगिक संबंध बलात्कार नाही

By admin | Updated: January 23, 2017 04:15 IST

विवाहाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेल्या लैंगिक संबंधांना प्रत्येक वेळी बलात्कार म्हणता येणार नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई : विवाहाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेल्या लैंगिक संबंधांना प्रत्येक वेळी बलात्कार म्हणता येणार नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. लग्नापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या सुशिक्षित मुलीने तिने केलेल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, नंतर बलात्काराचा आरोप करू नये, असेही न्यायालायने स्पष्ट केले. एका मुलीने तिच्या प्रेमभंगानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात या २१ वर्षीय तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना, न्या. मृदुला भटकर यांनी हे मत नोंदवले. या तरुणाने लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त केले होते, असा दावा या मुलीने केला होता. न्यायमूर्ती मृदुला भटकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देताना स्पष्ट केले की, लैंगिक संबंधांसाठी फसवून संमती मिळवली असेल तर हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. मात्र, अशा प्रकारे प्रलोभन दाखवून संबंधित मुलीला उद्युक्त केले गेले, यासाठी ठोस पुरावा असायला हवा. मात्र, या प्रकरणात लग्नाचे वचन हेच कारण लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणारे ठरले, असे म्हणता येणार नाही. संबंधांत तणाव आल्यानंतर किंवा ते संबंध संपल्यानंतर अशा प्रकरणांत गु्न्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीत वाढ होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठतेने पाहायला हवे. आधुनिक युगात अनेक प्रलोभनांपैकी लैंगिक संबंधांचेही प्रलोभन युवापिढीसमोर आहे. मात्र अशा संबंधांवेळी मुलींनी त्यांची जबाबदारी नाकारू नये, असेही त्यांनी नमुद केले. (प्रतिनिधी)