शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी देशातील सर्वात मोठा घोटाळा

By admin | Updated: December 30, 2016 21:03 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.  बँका आणि एटीएमसमोरील लोकांच्या रांगा कायम असून, व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील कोणताही काळा पैसा बाहेर निघालेला नाही. उलट हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला. ते शुक्रवारी रविभवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पुनिया पुढे म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्याच दिवशी कोलकाता येथील एका बँकेतील भाजपाच्या खात्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये तीन कोटी रुपये जमा झाले. तसेच मागील १ मार्च २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भाजपा आणि आरएसएसने देशभरातील आपल्या खात्यांमध्ये किती रक्कम जमा केली, याची वारंवार माहिती मागूनसुद्धा ती दिली गेलेली नाही. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी भाजपा व आरएसएसने देशभरात कोट्यवधीच्या संपत्तीची खरेदी केली आहे. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच त्यांनी निर्णयापूर्वी काळ्या पैशातून संपत्ती खरेदी करून तो पैसा पांढरा केला आहे, असाही पुनिया यांनी गंभीर आरोप केला.त्यामुळे सरकारने बँक खात्यातील पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध हटवून प्रत्येकाच्या खात्यातील जमा रकमेवर १८ टक्के व्याज देण्यात यावे, तसेच बीपीएल कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करण्यात यावेत. तसेच लहान दुकानदार आणि उद्योगांना प्राप्तिकर आणि विक्री करात ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शिवाय नोटाबंदीमुळे सध्या देशातील लोकांना होत असलेला त्रास जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा या निर्णयाविरुद्घ संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.