शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नोटाबंदी - मच्छीमारांवर आली उपासमारीची पाळी

By admin | Updated: November 16, 2016 20:03 IST

केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग

मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. १६ - केंद्र सरकारने गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतलेल्या ५०० आणि १००० नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला आहे.मुंबईसह,रायगड,पालघर,ठाणे,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग येथील मासेमारी व्यवहार ठप्प झाला आहे. मच्छीमारी खर्च प्रामुख्याने रोखीवरच असल्यामुळे मच्छीमारांचा दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.राज्यातील समारे ५० टक्के मच्छीमार नौका समुद्रकिनारी शाकारल्याचे राज्यातील चित्र असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली.मच्छीमारांचा रोजचा व्यवहार हा प्रामुख्याने जिल्हा बँका आणि सहकारी बँकेच्या माध्यामतून होता.मात्र केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारास बंदी घातल्यामुळे मच्छीमार सहकारी संस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.सहकारी चळवळच मोडीत निघण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जशी कर्ज माफीची सवलत दिली आहे तशी सवलत देशातील मच्छीमारांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबईतील ससून डॉक,भाऊचा धक्का,छत्रपती शिवाजी मार्केट,दादर मार्केट,मालाड(प)येथील साईनाथ मार्केट येथे रोज ताजी मासळी येते,मात्र नोटा बंदीमुळे येथील होलसेल मासळी व्यवहार ठप्प झाला असून नाशिवंत मासळी सडून जात असल्याची माहिती संधे यांनी दिली.रोज मासेमारीसाठी जायचे की घर खर्चासाठी बँकेत पैशासाठी रांगा मच्छीमारांना लावायच्या या चिंतेत मच्छीमार सापडला असल्याची माहिती संघाचे मुंबई अध्यक्ष विजय वैती आणि रायगड अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी दिली. खोल मासेमारीसाठी किमान ५ ते ८ दिवसांसाठी लागणारे डीझेंल,बर्फ,लागणारा कच्चा माल आणि खलाश्यांचा पगार असा मच्छीमारांना खर्च सुमारे दीड ते दोन लाख रुपये येतो.राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला असून राज्यात ३२८ मच्छीमार गावे असून ३२५ मच्छीमार बंदरे आहेत.तर राज्यात सुमारे ११६६७ यांत्रिक व ८००० बिगर यांत्रिकी बोटी आहेत.मासेमारीच्या निर्यातीतून देशाला वर्षाला सुमारे १२००० कोटी परकीय चलन मिळते.या नोटा बंदीचा मासेमारीच्या निर्यातीला देखिल मोठा फटका बसला असल्याची आकडेवारी संधे यांनी दिली.