शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प राज्याबाहेर?

By admin | Updated: May 27, 2015 01:37 IST

अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना भूसंपादन, मूलभूत सुविधा, प्रकल्प उभारणीचे ना हरकत प्रमाणपत्र, मंजुरी प्रक्रिया व वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव लालफितीमध्ये अडकला आहे.

पुणे : महाराष्ट्रात सरकार बदलले तरी कारभार बदलेला नाही. अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना भूसंपादन, मूलभूत सुविधा, प्रकल्प उभारणीचे ना हरकत प्रमाणपत्र, मंजुरी प्रक्रिया व वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव लालफितीमध्ये अडकला आहे. त्यामुळे कोट्यवधीची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याऐवजी मध्य प्रदेश व आंध्रप्रदेश राज्यात करण्याच्या मानसिकतेत खासगी उद्योजक आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा विकास, प्रचार व संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) ही स्वायंत्त संस्था स्थापन झाली. पहिल्या काही वर्षांतच ‘मेडा’ने सौर, पवन, चिपाडापासून सहवीज या अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात महाराष्ट्राला आघाडी नेले. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांत मेडाचे अधिकार गोठविण्यात आले. गेल्या वर्षभरापासून मेडाला पूर्णवेळ महासंचालक देण्यात आलेला नाही. त्यामुळे मेडा असूनही त्याचा फारसा उपयोग अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पासाठी होताना दिसत नाही.दरम्यान, केंद्रातील ग्रीन इंडिया मोहिमेनंतर मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्यांनी आघाडी घेतली आहे. फेब्रुवारीनंतर मध्य प्रदेश राज्यात नव्याने सुमारे ५००० मेगावॅटचे करार झाले आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सुमारे १००० मेगावॅट प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही राज्यातील धोरणे अपारंपारिक ऊर्जानिर्मीतीला प्रोत्साहन देणारी आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात पवन ऊर्जा प्रकल्पातील गुंतवणूकदारांना अडचणींना सोमोरे जावे लागत आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळीच योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रबाहेर जाण्याची शक्यता आहे. (समाप्त) च्राज्यात एक खिडकी योजना नसल्याने एका प्रकल्पाची मंजुरी घेण्यासाठी महाराष्ट्रात विविध विभागांच्या परवानगीसाठी किमान दोन वर्षे लागतात. मात्र, ऐवढा वेळ थांबणे गुंतवणूकदार कंपन्यांना अडचणीचे ठरत आहे. त्याविषयीची नाराजी वाढत चालली आहे.च्ग्रीन इंडियाला पूरक अपारंपारिक ऊर्जा धोरण च्मेडाला पूर्ण अधिकार व पूूर्णवेळ महासंचालकच्परवानगीसाठी एक खिडकी योजना आवश्यक च्भूसंपादन व ना हरकत प्रमाणपत्र तातडीने मिळावे.च्स्थानिक विरोध व राजकीय हस्तक्षेप नको.