शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीस असहकार

By admin | Updated: February 20, 2016 03:11 IST

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघद्वारा संचालित विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने (विजुक्टा) बारावी बोर्ड परीक्षेच्या

अकोला : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघद्वारा संचालित विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने (विजुक्टा) बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीस असहकार दर्शवित आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विज्युक्टाने गत शैक्षणिक वर्षातसुद्धा याच पद्धतीने असहकार आंदोलन पुकारले होते आणि त्यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल नियोजित तारखेपेक्षा आठ दिवस उशिराने जाहीर करावा लागला होता.राज्यात गुरुवारपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. २८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनेक मागण्या दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. माहिती व तंत्रज्ञान विषयाला अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. शैक्षणिक वर्ष २००३-०४ ते २०१०-११ या आठ वर्षात पायाभूत पदातील वाढीव पदांवर शिक्षक वेठबिगारीप्रमाणे विनावेतन काम करीत आहेत. मूल्यांकनास पात्र विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्यावे, २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी देण्यात यावी, अशा एकूण २0 प्रकारच्या मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देत, १५ आॅगस्ट २0१५पासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्याप आॅनलाइन संचमान्यतेतील त्रुटी दूर करण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याच मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बारावीच्या परीक्षा काळातच यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा विजुक्टाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे व महासचिव प्रा. डॉ. अशोक गव्हाणकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)