शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी : बँकेच्या रांगेतील वृद्धांना मदतीचे चिमुकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 15:35 IST

गडचिरोलीमधील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालायचे विद्यार्थ्यांनी बँकांच्या रांगेतील वयोवृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. 18 -  देशातील चलनातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 8 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आल्या. त्यानंतर देशभरातील बँक, एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी, जुन्या नोटा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रांगेमध्ये वयोवृद्ध नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत, यातील काही जण अशिक्षित असल्याने बँकांमधील नोटा बदलण्याची प्रक्रियेत त्यांना अडचण येत आहे तसेच शारीरिक त्रासदेखील होत असल्याचे समोर आले.
 
याच पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालायचे विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या 10  दिवसांपासून हे विद्यार्थी भारतीय स्टेब बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जाऊन वृद्ध नागरिकांना पावती भरण्यासाठी, कागदपत्राच्या झेरॉक्सही काढण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी मदत करत आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी ग्राहकांना पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करुन देत आहेत. 
 
शाळेचे मुख्याध्यापक रहिम अमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. बँकातील गर्दी आटोक्यात येईपर्यंत वृद्ध नागरिक , महिलांसह अन्य लोकांना आमचे विद्यार्थी मदत देतील, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. जवळजवळ गेल्या 10 दिवसात 500 हून अधिक ग्राहकांना या विद्यार्थ्यांकडून सेवा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.