शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीने अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजविले - सुनिल तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:54 IST

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांना मोठा फटका बसला आहे.

मुंबई : नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांना मोठा फटका बसला आहे. सर्वसामान्य जनतेचा वर्षानुवर्षांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे आता जनताच या सरकारला पायउतार करेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी बुधवारी केली.नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आझाद मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. सुनिल तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नोटाबंदीचे विधीवत श्राद्धही घालण्यात आले. यावेळी तटकरे म्हणाले की, ‘नोटाबंदीमुळे आर्थिक चालना मिळेल असे वाटले होते. प्रत्यक्षात देश आर्थिक मंदीकडे वळला. आर्थिक व्यवस्था कोलमडल्याने महागाई वाढली. शेतकरी, शेतमजुर उध्वस्त झाला.’ देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवण्याचे काम नोटाबंदीच्या निर्णयाने केल्याचा आरोप तटकरे यांनी केला. यावेळी नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर, नोटाबंदीचा निर्णय म्हणजे या देशातील सगळयात मोठा घोटाळा असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली.राष्ट्रवादीकडून नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काळा दिवस पाळण्यात आला. आझाद मैदान परिसरातील आंदोलना दरम्यान विधीवत वर्षश्राध्द घालण्यात आले. यावेळी ‘नोटाबंदीचं करायचं काय, मोदीला मत द्यायचं नाय...ये तो सिर्फ झांकी है, अभी इलेक्शन बाकी है...मोदी सरकार हाय-हाय...’ अशा घोषणाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.नाशकात घातले श्राद्धकाँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोदातीरी नोटाबंदीचे विधिवत श्राद्ध घातले. महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी चक्क मुंडण केले. या वेळी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पुणे, नागपूर, औरंगाबादसह सर्वच जिल्ह्यांत नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, ‘आप’सह विविध संस्था, संघटनांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. शिवसेनेच्या वतीने नोटाबंदीच्या विरोधात प्रतीकात्मक श्राद्धविधी कार्यक्रम करण्यात आला. गोदाकाठावर विधिवत मंत्रोच्चारात केंद्र सरकारच्या नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात आले.

टॅग्स :Note Banनोटाबंदी