शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

कुणाला मिळाले यश अन् आश्वासन!

By admin | Updated: December 25, 2014 00:25 IST

न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी वेगवेगळ्या ७१ संघटनांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पटवर्धन मैदानात १७ दिवस धरणे आंदोलन, उपोषण केले. त्यातील काही संघटनांच्या मागण्या पूर्ण झाल्या,

१७ दिवसांत ७१ संघटनांचे धरणे आंदोलन : ११५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्तगणेश खवसे - नागपूरन्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी वेगवेगळ्या ७१ संघटनांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पटवर्धन मैदानात १७ दिवस धरणे आंदोलन, उपोषण केले. त्यातील काही संघटनांच्या मागण्या पूर्ण झाल्या, काहींना आश्वासन मिळाले तर मोजक्या संघटना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मागण्यांवर ठाम होत्या. यावर्षी प्रथमच तत्परतेने आंदोलकांची संबंधित मंत्री, विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून त्यांचे प्रश्न निकाली लावण्याचे काम करण्यात आले, हे विशेष!हिवाळी अधिवेशन काळात धरणे आंदोलन करण्यासाठी पटवर्धन मैदानाची जागा निश्चित करण्यात आली आहे. तेथे ८ डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार संघटनांनी धरणे आंदोलन केले. ९ डिसेंबरला ७, १० डिसेंबरला ८ तर ११ डिसेंबरला तब्बल ११ संघटनांची त्यात भर पडली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी १२ डिसेंबरला ६ संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केले. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी १५ डिसेंबरला १५, १६ डिसेंबरला ९, १७ डिसेंबरला ३, १८ डिसेंबरला ४ आणि १९ डिसेंबरला १ याप्रकारे धरणे आंदोलन करणाऱ्या संघटनांची भर पडली. अखेरच्या आठवड्यात २२ डिसेंबरला २ आणि २३ डिसेंबरला केवळ १ अशा एकूण ७१ संघटनांनी अधिवेशनाच्या १७ दिवसांत धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनासाठी एकूण ११५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी अशाप्रकारे सुरक्षा व्यवस्था होती. ११५ पोलिसांमध्ये पोलीस अधीक्षक (एस. एस. वळवी, नाशिक), एक नोडल आॅफिसर (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा) बाजीराव पोवार, चार पोलीस निरीक्षक (दोन पुणे ग्रामीण आणि दोन औरंगाबाद ग्रामीण), सहा पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला पोलीस उपनिरीक्षक, १०१ पोलीस कर्मचारी (महिला आणि पुरुष) यांचा समावेश होता. धरणे आंदोलनादरम्यान येथे कोणतीही अनुचित घटना झाली नाही. आंदोलकांनीही पोलिसांना सहकार्य केले. वैद्यकीय सेवासुद्धा येथे पुरविण्यात आली होती. रात्रीसुद्धा डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सूचना पोलिसांनी केली होती.रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यानी रात्रीसुद्धा ड्युटी बजाविली. धरणे आंदोलन करणाऱ्यांना सर्वाधिक भेट देणाऱ्या मंत्र्यांमध्ये अग्रक्रम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा लागतो. त्यांनी धरणे मंडप स्थळी हजेरी लावली. काही संघटनांनी केवळ धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. त्यांनी साखळी उपोषण केले काहींनी तर आमरण उपोषणही सुरू केले. मात्र त्यांनाही आम्ही सहकार्य केले, असे पोवार यांनी सांगितले. अनेक संघटनांचे समाधानआम्ही सर्वप्रथम धरणे आंदोलन करणाऱ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. त्यांना विश्वासात घेऊन संबंधित मंत्री, विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची भेट घालून दिली. अनेक संघटनांचे तेथे समाधान झाले, आश्वासन मिळाले. यामुळे ज्या दिवशी आंदोलन सुरू झाले, त्याच दिवशी अनेक संघटनांनी आंदोलनाची सांगता केली. हे आमचे यश आहे.बाजीराव पोवार,पोलीस निरीक्षक (नोडल आॅफिसर), गुन्हे शाखा, नागपूर.