शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

'रईस' शाहरूखला पाहण्यासाठी उडाली झुंबड, एकाचा मृत्यू

By admin | Updated: January 24, 2017 14:06 IST

'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणा-या शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर झुुंबड उडाली व त्यातच एकाचा मृत्यू झाला.

मुंबई : 'रईस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणा-या शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर झुुंबड उडाली व त्यातच एकाचा मृत्यू झाला. 

चित्रपट प्रमोशसाठी मुंबई ते दिल्ली प्रवास आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने करणार असल्याचे ट्विट शाहरूखने केले, त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईतही त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते. वडोदरा रेल्वे स्थानकातही चाहत्यांची झुंबड उडाली होती, त्यामध्ये समाजवादी पार्टीचे  माजी नगरसेवक फरीद खानही उपस्थित होते. 

गाडी वडोदरा स्थानकात पोहोचताच शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आणि त्यांनी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमुळे स्थानकात एकच गोंधळ माजला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमारही केला, त्यामुळे एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीही झाली. या गर्दीत फरीद खान यांनाही धक्काबुक्की होऊन ते जमिनीवर कोसळले. गर्दीतून वाट काढणे अशक्य झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच या चेंगराचेंगरीत पोलिसांसह अन्य ४ जण जखमी झाले आहेत.   

चाहत्यांची निराशा 

 शाहरुख राजधानीने जाणार असल्याने एसी टू टीअर श्रेणीचे दोन डबे त्याच्यासाठी आणि सह कलाकार तसेच काही पत्रकारांसाठी आरक्षित केले होते. शाहरुखची व्यवस्था ‘ए-५’डब्यात होती. ही गाडी सुटते त्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सजावटही केली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला प्रत्यक्षात बघता येईल आणि त्याच्यासोबत एक फोटो काढता येईल यासाठी स्थानकाबाहेरुन आणि स्थानकात चाहत्यांनी जिथे मिळेल तेथे जागा पकडली होती. बराच वेळ सुरु असलेल्या गोंधळात शाहरुख खान संध्याकाळी ५.४७ च्या सुमारास प्लॅटफॉर्मवर आला. मात्र कुणालाही कळायचा आत पोलीस आणि अंगरक्षकांच्या गराड्यात त्याने आपल्या आरक्षित डब्यात प्रवेश केला आणि त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली.  

 

शाहरुखमुळे राजधानीचा खोळंबा?

दरम्यान वक्तशीरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा 'रईस'च्या प्रमोशनमुळे चांगलाच खोळंबा झाला. मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी शाहरूख आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने जाणार होता. त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. पण शाहरुखला स्थानकात पोहोचण्यासच उशीर झाल्यामुळे नेहमीच्या ५ वाजून ४० मिनिटांच्या वेळेऐवजी ही गाडी ५ वाजून ४८ मिनिटांनी सुटली. शाहरुख राजधानीने जाणार असल्याने एसी टू टीअर श्रेणीचे दोन डबे त्याच्यासाठी आणि सह कलाकार तसेच काही पत्रकारांसाठी आरक्षित केले होते. शाहरुखची व्यवस्था ‘ए-५’डब्यात होती.