शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खोटे बोलण्याचे नोबेल आमच्या भावाला मिळेल- पंकजा मुंडे

By admin | Updated: February 9, 2017 16:34 IST

भावामुळे मी वैतागून गेले आहे, आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल

ऑनलाइन लोकमतउदगीर/जळकोट, दि. 9 - भावामुळे मी वैतागून गेले आहे, आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल, अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा नामोल्लेख टाळून गुरुवारी उदगीरमध्ये केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उदगीर व जळकोट तालुक्यांतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी उदगीर व जळकोट येथे सभा घेतल्या. यात त्यांनी त्यांचे बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्या म्हणाल्या, माझ्यावर कितीही टीका केली तरी बोलले नाही. परंतु आता माझ्या लोकांनी मौन बाळगू नका, उत्तर द्या़, अशी शपथ घातलीय. म्हणून मी बोलतेय, आमचे बंधू म्हणतात, गोपीनाथ मुंडेंनी त्यांना बाहेर काढले. आम्हाला जायचे नव्हते. त्याच्या दोनच दिवसांनी अजित पवार म्हणतात, धनंजयने दीड वर्ष आमच्याकडे चकरा मारल्या. शेवटी दुसऱ्या पक्षात जातो म्हटल्यावर आम्ही घेतले. मग आता खोटं कोण बोलतंय, हे त्यांनी जाहीर करावेच. गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सिंहासनावरून उतरवण्याचे काम केले आहे. आता परत तेथे बसू न देण्याचे काम आम्ही करू, इंग्रजांची जुलमी राजवट गेली अन् त्यांच्याहून जुलमी काँग्रेसची राजवट देशात आली. यांनी नागरिकांना गरिबीतच ठेवले. आता ही राजवटही दूर करा अन् भाजपाला व पर्यायाने विकासाला साथ द्या, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, व्यंकट तेलंग, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, माजी आमदार मनोहर पटवारी, रमेश कराड यांच्यासह पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.वाढदिवसाचे नवे संशोधनगोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसावरून चाललेल्या वादावर बोलताना पंकजा मुंडेंनी अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतले. त्या म्हणाल्या, आता तर नवीन संशोधनच यांनी सुरू केले आहे. गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस कुठला? ते आता हयात नाहीत. मृत शत्रूबद्दलही आपण वाईट बोलत नाही़ ते जिवंत नसताना हिणवण्याचे काम करू नका, असंही त्यांनी ठणकावलं आहे.