भाजपाने फिरवला शब्द
यदु जोशी - मुंबई
टोल रद्द करण्याऐवजी टोलच्या वसुलीमध्ये पारदर्शकता आणू, असे सांगत भाजपा सरकारने राज्यरोहणाच्या दुस:याच दिवशी ‘टोलमुक्ती’च्या आश्वासनाकडे पाठ फिरवली!
आमचे सरकार सत्तेवर येताच राज्यातील सर्व टोलनाके बंद करू, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. जाहीरनाम्यातही तसा उल्लेख होता. पण सरकार सत्तारूढ होऊन 48 तास उलटण्याआधीच नव्या सरकारने टोलमुक्तीचा शब्द फिरवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल रद्द करण्यास विरोध दर्शविला होता. टोल रद्द करणो व्यवहार्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. शेवटी गडकरींच्या मताशी नव्या भाजपा सरकारला सहमती दर्शवावी लागली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, टोलसंबंधी काही अर्थतज्ज्ञांशी मी चर्चा केली. टोल रद्द करणो व्यवहार्य होणार नाही, असे मत त्यांनी दिले आहे. रस्ते आणि पुलांचा वापर करणा:यांनी त्यासाठी पैसा मोजला पाहिजे म्हणजे ‘युजर शुड पे’ हे सूत्र जगातील अनेक देशांनी स्वीकारलेले आहे. टोलचा पर्याय माङयासमोर आहे. त्यासाठीचा आराखडादेखील तयार आहे, पण विकासाची गती साधण्याला प्राधान्य द्यायचे तर टोल रद्द करणो व्यवहार्य नाही.
टोलमाफिया, टोलद्वारे लूट करणा:यांच्या दबावाखाली माङो सरकार काम करणार नाही. त्याची टेंडर प्रक्रिया, नवीन पूल आणि रस्ते बांधतानाचा खर्च आणि टोलद्वारे वसूल केली जाणारी रक्कम यांचा अनुपात याचा योग्य विचार पुढील काळात केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले. कंत्रटदारांचे हित जपण्यासाठी नागरिकांच्या खिश्याला कात्री लागणार नाही. अन्यायकारक टोलनाके बंद केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
टोलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या भाजपाच्या घोषणोचे काय झाले, असा सवाल काँग्रेसने आज केला. टोल रद्द न करता त्यातील उणिवा दूर करण्याचे आश्वासन भाजपाने दिलेले नव्हते, तर टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते याची आठवण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी करून दिली.
टोलनाक्यांची सद्य:स्थिती
बांधकाम विभागाचे टोलनाके 38
राष्ट्रीय महामार्ग 4क्
एमएसआरडीसी 44
एकूण 122
1 जुलै 2क्14 रोजी बांधकाम विभागाचे 34 आणि रस्ते एमएसआरडीसीचे 1क् असे एकूण 44 टोलनाके बंद करण्यात आले होते.