शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसल्याने सरपंचाचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: June 1, 2017 02:22 IST

घरात शौचालय नसल्याने व सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम केल्याने वडगाव कातवी ग्रामपंचायतच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव मावळ : घरात शौचालय नसल्याने व सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम केल्याने वडगाव कातवी ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना भोकरे यांचे सदस्यत्व प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी रद्द केले आहे. याबाबत भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे यांनी ११ जानेवारी २०१७ रोजी सरपंच भोकरे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.प्रभारी जिल्हाधिकारी काळे यांनी दोन्ही बाजूकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दोन्ही बाजूकडून झालेला युक्तिवाद, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झालेला अहवाल व शौचालय नसल्याने तसेच त्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याबाबत ग्रामसभा ठरावाद्वारे प्रमाणित करून प्रमाणपत्र सादर केले नाही आदी बाबी लक्षात घेऊन मंगळवारी त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत राहण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश दिला. मावळातील श्रीमंत व प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या वडगाव ग्रामपंचायतमध्ये भोकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नाट्यमयरित्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शहर विकास समितीने सत्ता स्थापित केली. भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या भोकरे यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे सत्ताधारी भाजपाची कोंडी झाली होती. याचे शैल्य मनात ठेवून भाजप सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. भोकरे यांचे सदसत्व रद्द झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाची प्रत मला अजून भेटली नाही. त्यामुळे पुढे काय निर्णय घायचा ते प्रत मिळाल्यावरच ठरवू. त्यामुळे या विषयावर मी आता काहीही बोलणे उचित ठरणार नाही, असे अर्चना भोकरे यांनी सांगितले.