शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी मंडप नको

By admin | Updated: March 14, 2015 05:48 IST

नागरिकांना मोकळे व चांगले रस्ते उपलब्ध करू देणे, ही महापालिकेची जबाबदारी असून, शांततेत जगणे हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे़

मुंबई : नागरिकांना मोकळे व चांगले रस्ते उपलब्ध करू देणे, ही महापालिकेची जबाबदारी असून, शांततेत जगणे हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे़ त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उत्सवांसाठी मंडप उभारण्याची परवानगी पालिकेने मंडळांना देऊ नये़ विनापरवाना लाऊड स्पीकर लावणाऱ्या मंडळांवर तसेच रात्रीच्या वेळेस फटाके फोडणाऱ्यांवरही कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले़ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ़ महेश बेडेकर यांनी संदर्भात जनहित याचिका केली आहे़ त्यात सादर झालेल्या दोन स्वतंत्र अर्जांवर न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ हे आदेश देताना मंडपांसाठी परवानगी देण्याकरिता पालिकेने धोरण निश्चित करावे, असे बजावले़ हे धोरण करताना अधिक रहदारी व वाहतूक असलेल्या ठिकाणी, हॉस्पिटल, कॉलेज, रेल्वे स्थानक व बस स्टॅण्डजवळ मंडप उभारण्याची परवानगी देऊ नका, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले आहे़न्यायालयाने ४६ पानी आदेशात विनापरवाना लाऊड स्पीकर लावणारी मंडळे व नागरिक यांच्यावरही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत़ शांतता क्षेत्रासह इतर ठिकाणी विनापरवाना लाऊड स्पीकर लागला असल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी एक यंत्रणा स्थापना करा़ या यंत्रणेकडे नागरिक टोल फ्री  नंबर, एसएमएस व ई-मेलद्वारे तक्रार करू शकतील़ या तक्रारीची नोंद ठेवा व किती तक्रारींवर कारवाई केली याचा तपशील जिल्हा कार्यालय व महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत़तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईपर्यंत १०० नंबरवर अधिक आवाजाची तक्रार करण्याची व्यवस्था करा़ याद्वारे येणाऱ्या तक्रारीवर स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ कारवाई करावी़ प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन लाऊड स्पीकर बंद करावा व पुढे जाऊन लाऊड स्पीकर वापरण्याचा परवानाही रद्द करावा़ तसेच म्हणजे शांतता क्षेत्रात रात्रीच्या वेळेस फटाके फोडणाऱ्यांवरही कारवाई करा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़दहीहंडी, गणपती व नवरात्रौत्सव सुरू होण्याआधी याचे महापालिकेने याचे धोरण निश्चित करून त्याची माहिती नागरिकांना द्यावी़ एखाद्या मंडळाने गेल्यावर्षी आवाजाचे नियम पाळले नसल्यास त्या मंडळाला लाऊड स्पीकरची परवानगीच देऊ नका, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़ प्रशासनाने हे धोरण निश्चित करून त्याची माहिती येत्या ६ जूनला न्यायालयात सादर करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत़ (प्रतिनिधी)