शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील रस्त्यांची डागडुजी नाहीच

By admin | Updated: June 30, 2016 03:21 IST

एमआयडीसीचा कारभार वादग्रस्त ठरला असतानाच पहिल्याच पावसात या परिसरातील रस्त्यांची पोलखोल झाली आहे.

डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटामुळे एमआयडीसीचा कारभार वादग्रस्त ठरला असतानाच पहिल्याच पावसात या परिसरातील रस्त्यांची पोलखोल झाली आहे. अगोदरच नादुरुस्त असलेल्या येथील रस्त्यांवरील खड्ड्यांत रसायनमिश्रित पाणी साचलेले असल्याने त्यातून चालणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच दुचाकी वाहनचालकांना आजारांना सामोरे जाण्याची भीती सतावत आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी गतवर्षी २५ लाखांच्या निधीची तरतूद एमआयडीसीने केली होती. मात्र, त्याच वेळेत ती गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने तो निधी परत गेल्याची माहिती एका वरिष्ठ अभियंत्यांनी दिली.पावसाच्या जेमतेम चारपाच दिवसांच्या संततधारेमुळे एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांत पाणी साचून राहिले आहे. त्यामध्ये रसायने मिसळली गेल्याने रंगीबेरंगी झालेल्या पाण्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. अगोदर खड्डे बुजवा आणि ज्या कंपन्यांचे रसायन रस्त्यांवर येते, त्या कंपन्यांना नोटीस बजावा, कडक कारवाई करा, अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पडलेले रसायन दिसून आले, म्हणजे एरव्ही अशा घातक रसायनांमुळे सर्वसामान्यांना त्वचारोग, श्वसनाचे रोग का व कसे होतात, ते स्पष्ट होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वर्षभरानंतरही दुर्लक्षचएमआयडीसीअंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद होती. पण, तो भाग आता केडीएमसीत आला. त्यास आता वर्ष झाले, परंतु वर्षभरात तेथील रस्ते, पदपथ, पायवाटांचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेनेही विशेष प्रयत्न केले नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. त्यामुळे तेथील नगरसेवक, महापालिकेच्या ई प्रभागातील अधिकारी आदींची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.