शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या बदल्यात रक्कम देण्याची गरज नाही- न्यायालय

By admin | Updated: December 22, 2016 19:46 IST

वाहन पार्किंगकरिता खळवाळी येथे पार्किंग प्लाझा तयार करण्यात येत असून संत गजानन महाराज संस्थानला ती जागा विकसित करण्यासाठी द्यावी

ऑनलाइन लोकमतशेगाव (जि.बुलडाणा), दि. 22 - शेगाव येथे येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंगकरिता खळवाळी येथे पार्किंग प्लाझा तयार करण्यात येत असून संत गजानन महाराज संस्थानला ती जागा विकसित करण्यासाठी द्यावी. त्याबदल्यात अकोट मार्गावरील संस्थानची अकरा एकर जागा शासनाला मिळेल आणि संस्थानकडून फरकाची रक्कम घेण्यात येवू नये, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले.शेगाव शहराच्या विकासाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर न्या.भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने वरील निर्देश दिले. शेगाव येथे येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंगकरिता खळवाडी झोपडपट्टीच्या जागेवर पार्किंग प्लाझा निर्माण करण्यात येणार आहे. या जागेच्या बदल्यात संस्थान शासनाला अकोट मार्गावरील अकरा एकर जागा देणार आहे. मात्र राज्य सरकारने १३ डिसेंबरला शपथपत्र दाखल करुन खळवाडीच्या जागेची किंमत पंधरा कोटी रुपये आहे तर अकोट मार्गावरील अकरा एकर जागेची किंमत ही दहा कोटी रुपये आहे. त्यामुळे फरकाची रक्कम संस्थानकडून घेण्यात यावी, अशी विनंती केलीहोती. त्यावर संस्थानने सांगितले की, प्रथम अकरा एकरच्या बदल्यात अकरा एकर जागा देण्यात येणार होती. परंतु त्यानंतर ती नऊ एकर आणि आता सहा एकरावर आली आहे. शिवाय पार्किंग प्लाझा बांधण्याची जबाबदारी शासन किंवा नगर परिषदेची असताना संस्थान पार्किंग प्लाझा बांधत आहे. खळवाडीच्या जागेवर २२ दुकानदारांचे अतिक्रमण असून तीन खासगी भूखंड असल्याची बाब न्यायालयाच्या निर्देशनास आणून देण्यात आली. न्यायालयाने फरकाची रक्कम न देता जागा हस्तांतरित करण्यात यावी आणि संस्थानने पार्किंग प्लाझा तयार करावा. तसेच ही जागा सरकारची आहे, तर त्या ठिकाणी खासगी भूखंड कसे? याची एका महिन्यात चौकशी करावी. हे भूखंड सरकारी असतील तर अतिक्रमण काढण्यात यावे. परंतु जर ते का खासगी असतील तर सरकारने ते अधिग्रहित करुन द्यावे.तसेच नगर परिषद बांधत असलेल्या संकुलातील २२ गाळे संस्थानने विकत घेवून ते खळवाडीच्या जागेतील व्यावसायीकांना द्यावे, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड.फिरदोस मिर्झा, संस्थानतर्फे अ‍ॅड.अरुण पाटील आणि राज्य सरकारतर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.