शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एकही मंत्री भ्रष्ट नाही !

By admin | Updated: July 23, 2016 07:06 IST

विरोधकांना सल्ला देत आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठामपणे सांगितले.

मुंबई : एकच आरोप करा, पण जोरदार करा. उगाच हवेत वार करू नका, असा विरोधकांना सल्ला देत आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठामपणे सांगितले. तर कलंकित मंत्र्यांबाबत समाधानकारक उत्तर न देता सरकारने पळ काढला, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह विरोधकांनी आरोप केलेल्या सर्व मंत्र्यांची पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली. पंकजा मुंडे, गिरीश महाजन, दिवाकर रावते, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र वायकर आणि रवींद्र चव्हाण आदी मंत्र्यांवर विरोधकांनी विविध आरोप ठेवले होते. खडसे यांना दाऊदच्या पत्नीचे कॉल्स आल्याच्या आरोपातून लोकायुक्तांनीच निर्दोष मुक्तता केली आहे. एसीबीने कोर्टात गजानन पाटीलविरुद्ध दाखल केलेल्या अरोपपत्रात कुठेही खडसेंचे नाव नाही. तसेच, दाऊदच्या पत्नीने त्यांच्या नंबरवर कॉल्स केलेच नव्हते, हेही आता स्पष्ट झाले आहे. शिवाय, खडसेंवर या बाबत आरोप करणाऱ्या मनीष भंगाळेला पुरावेही देता आलेले नाहीत. आता तो त्याचे मेल हॅक झाल्याचे सांगत आहे. या प्रकरणी चौकशी करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘असे होते तर मग खडसेंनी राजीनामा का दिला?’, अशी विचारणा विरोधी पक्ष सदस्यांनी जागेवर बसूनच केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्याच्या जमीन प्रकरणी चौकशीसाठी न्या.झोटिंग समिती नेमली असून ती तीन महिन्यांत अहवाल देईल. मी स्वत: त्यावेळी खडसेंशी चर्चा केली होती. मी मंत्रीपदावर असलो तर निर्दोष सुटलो तरी चौकशीत दबाव टाकल्याचा आरोप होईल त्यापेक्षा चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा देतो, असे खडसे यांनीच आपल्याला मला सांगितले. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>हाथी चले बाजार तो...विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप केले. हाथी चले बाजार तो कुत्ते भोंकते हजार, अशी एक म्हण आहे. आता या म्हणीचे दोन अर्थ होतात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणाला कुत्ते म्हटल्याचा आरोप होऊ शकतो तर दुसरा अर्थ असाही आहे की आरोपांचे मनावर घ्यायचे नसते. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेने घायाळ झालेल्या विरोधकांनी त्यांचे भाषण संपताच गदारोळ केला. या गदारोळात उर्वरित कामकाज गुंडाळण्यात आले.