ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - दहीहंडी आणि गणेशोत्सवासंबंधीत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थित सोमवारी पार पडली. यावेळी दहीहंडीच्या थरांवर घालण्यात आलेली मर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित दहीहंडी आणि गणेशोत्सवासंबंधी चर्चा आज मंत्रालयात झाली. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दहीहंडीचे नियम शिथील करण्याची मागणी केली. तसेच, 12 वर्षाच्या मुलांनाही दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होऊ द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत दहीहंडीवर घालण्यात आलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी न्यायालयात करणार आहे. तसेच, दहीहंडीबद्दल राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडणार आहे.
दहीहंडीसाठी थरांची मर्यादा नको - राज्य सरकार
By admin | Updated: June 20, 2016 17:51 IST