शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

ना बाप बडा, ना भैया...

By admin | Updated: June 30, 2016 01:25 IST

औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप कंपनीच्या आवारात घडलेल्या रमेश रामेश्वर मिसाळ (२६) या कामगाराच्या आत्महत्येला काल धक्कादायक कलाटणी मिळाली.

औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप कंपनीच्या आवारात घडलेल्या रमेश रामेश्वर मिसाळ (२६) या कामगाराच्या आत्महत्येला काल धक्कादायक कलाटणी मिळाली. ही आत्महत्या नसून खून असल्याचे चिकलठाणा पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. ‘ना बाप बडा, ना भैया, सबसे बडा रुपय्या’ या गाण्याप्रमाणे मालमत्तेसाठी सख्खा लहान भाऊ गणेश मिसाळ (२२, रा. नारेगाव), बहीण जयश्री सोनटक्के व भावजी ओंकार सोनटक्के (रा. जालना) यांनीच रमेशचा खून केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली.खून करून नंतर आत्महत्येचा बनाव करणाऱ्या गणेश मिसाळ आणि ओंकार सोनटक्केया दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बहीण जयश्री फरार झाली असून, तिचा शोध घेण्यात येत असल्याचे चिकलठाण्याचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी सांगितले.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मयत रमेश मिसाळ हा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप या कंपनीत काम करीत होता. २५ मार्च रोजी त्याचा विवाह झाला होता. कंपनीच्या आवारातच असलेल्या क्वार्टरमध्ये रमेश आणि त्याची पत्नी विजया हे नवदाम्पत्य वास्तव्यास होते. त्याच्याच कंपनीत बहीण जयश्रीही काम करते आणि तीही रमेशच्या शेजारीच असलेल्या क्वार्टरमध्ये राहते. घरात सापडले होते फासावर लटकलेले प्रेत१६ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जयश्रीने आवाज देऊन भावजय विजयाला बोलविले आणि ‘आपण शौचाला जाऊन येऊ’ असे सांगितले. मग दोघी शौचाला गेल्या. विजयाला घेऊन जवळपास दीड तास जयश्रीने तितकाच वेळ ‘टाईमपास’ केला. साडेअकरा वाजेच्या सुमारास दोघी परत आल्या. विजयाने खोलीचा दरवाजा उघडताच आतमध्ये पती रमेशचे फासाला लटकलेले प्रेत तिच्या नजरेस पडताच तिला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस तेथे पोहोचले. फासावर लटकलेल्या रमेशचे पाय जमिनीला टेकलेले होते. त्यामुळे तेथेच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र, त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. पत्नीलाही आला होता संशयआपला पती आत्महत्या करूच शकत नाही, हा खून आहे आणि त्यात घरच्यांचाच हात आहे, असा संशय रमेशची पत्नी विजयालाही त्याच वेळी आला होता. कारण जेव्हा भावजयी जयश्रीने तिला रात्री शौचासाठी नेले. त्यावेळी तिला घरातून पतीच्या ओरडण्याचा आवाज आला. विजयाने जयश्रीला ‘मला त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला’ असे म्हटलेही होते; परंतु नाही तुला भास झाला, असे म्हणत तिने वेळ मारून नेली होती. त्यानंतर घरी येताच पतीचे प्रेत विजयाला नजरेस पडले. त्यामुळे विजयानेही हा खून असल्याची तक्रार करून याच्या चौकशीची मागणी केली होती. सहायक निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी मग तपासाची चके्र फिरविली. सर्व बाजूंनी तपास केला तेव्हा रमेशचा बहीण जयश्री व लहान भाऊ गणेशसोबत नारेगावातील वडिलांच्या घराच्या वाटणीवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. नेमक्या घटनेच्या वेळीच जयश्रीचे विजयाला घरातून बाहेर घेऊन जाणे, दीड तास फिरविणे, या गोष्टी पोलिसांना खटकल्या. अखेर गणेशला आणि जयश्रीचा पती ओंकारला काल ताब्यात घेऊन ‘खाक्या’ दाखविताच त्यांनी तोंड उघडले. आपणच खून केल्याची त्यांनी स्पष्ट कबुली दिली.