शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:52 IST

आॅनलाइन पीक विमा अर्ज भरण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेता शेवटच्या काही दिवसांत आॅफलाइन अर्ज घेऊन त्यानंतर आॅनलाइन पद्धतीने भरून घेतले जातील

मुंबई : आॅनलाइन पीक विमा अर्ज भरण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेता शेवटच्या काही दिवसांत आॅफलाइन अर्ज घेऊन त्यानंतर आॅनलाइन पद्धतीने भरून घेतले जातील. मात्र, आॅनलाइन पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा तूर्तास कोणताच विचार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. इंटरनेट आणि इतर असुविधांमुळे ग्रामीण भागात शेतकºयांना आॅनलाइन पीक विमा उतरवताना अडचणी येत आहेत. महा ई सेवा केंद्रांमध्ये दिवसभरात मोजक्याच शेतकºयांचे पीक विम्याचे अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे आॅफलाइन पीक विमा भरण्याचे निर्देश द्यावेत आणि योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने संपूर्ण देशात पीक विमा आॅनलाइन भरण्याचे निर्देश दिले आहेत. यातील अडचणींबाबत कृषी खात्याने केंद्र सरकारकडे सवलत मागितली होती. मात्र, बिहार आणि आसाम यांसारख्या मागास राज्यांत आॅनलाइन पीक विमा उतरवला जात असेल तर महाराष्ट्रात काय अडचण आहे, अशी विचारणा केंद्राकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अधिकाºयांच्याही ही बाब निदर्शनाला आणली आहे. त्यानुसार बँकांना पीक विमा भरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ३१ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने सुट्टीच्या दिवशीही बँकांचे कामकाज सुरू ठेवून पीक विम्याचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत.‘त्या’ बारवर कारवाई करणारमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याशेजारील ‘इस्टेला’ बारप्रकरणाची पोलीस महानिरीक्षक स्तरावरील अधिकाºयांकडून १५ दिवसांत चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. इस्टेला बार प्रकरणी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला विभागाकडून देण्यात आलेले उत्तर दिशाभूल करणारे असल्याचा मुद्दा नारायण राणे यांनी उपस्थित केला होता. जे प्रश्न विचारण्यात आले त्याला उत्तर म्हणून भलतेच उत्तर देण्यात आल्याची तक्रार राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नाराजीची तत्परतेने दखल घेतली.