शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात वाहनांना २८, २९ आॅगस्टला नो एण्ट्री

By admin | Updated: August 27, 2015 04:35 IST

सिंहस्थाची पहिली आणि सगळ््यात मोठी पर्वणी २९ आॅगस्ट रोजी असल्याने सुरक्षा व बंदोबस्ताचा भाग म्हणून २८ आणि २९ आॅगस्ट रोजी नाशिक शहरात कोणत्याही वाहनाला

ठाणे : सिंहस्थाची पहिली आणि सगळ््यात मोठी पर्वणी २९ आॅगस्ट रोजी असल्याने सुरक्षा व बंदोबस्ताचा भाग म्हणून २८ आणि २९ आॅगस्ट रोजी नाशिक शहरात कोणत्याही वाहनाला प्रवेशबंद करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अथवा नाशिकमार्गे जाणाऱ्या अथवा येणाऱ्या कोणत्याही वाहनाला नाशिकला जाणे टाळणे अथवा भला मोठा वळसा घालून जाणे, हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.२८ तारखेच्या मध्यरात्रीपासून ते २९ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध जारी असणार आहेत. त्यामुळे मुंबई, बृहन्मुंबई, कोकण येथून नाशकात जाणाऱ्या सर्व एसटी, टॅक्सी, खासगी बसेस नाशिकपासून १० किमी अंतरावर असलेल्या राजूरबहुला येथे उभारण्यात आलेल्या वाहनतळावरच थांबविल्या जातील. ज्यांना नाशिक शहरात जायचे असेल, त्यांनी तेथून सुटणाऱ्या शहर बससेवेच्या बसने नाशिकपर्यंतचा प्रवास करावा, तोदेखील नाशिक महामार्ग स्थानकापर्यंतच असेल. त्यापुढचा शहरातील सर्व प्रवास त्यांनी पायी करावा, असे नियोजन करण्यात आले आहे. या काळात शहरातील रिक्षा आणि अन्य खासगी वाहने यांनाही बंदी करण्यात आली आहे. जी वाहने नाशिक ओलांडून पुढे जाऊ इच्छित असतील, त्यांच्यासाठी घोटीवरून सिन्नर, निफाडमार्गे पिंपळगाव - बसवंत अथवा चांदवडमार्गे जाण्याची अनुमती आहे. परंतु, या मार्गाने ४० ते ५० किमीचा अतिरिक्त वळसा पडणार आहे. तसेच हा रस्ताही अरुंद असल्याने अपघात अथवा ट्रॅफिक जॅमची दाट शक्यता असणार आहे.एसटी, खासगी बसेस, टॅक्सी आदी वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने या दोन ते तीन दिवसांत नाशिकच्या दिशेने जाणारा अथवा येणारा प्रवाशांचा सर्व ओघ रेल्वेच्या दिशेने धाव घेईल. सिंहस्थासाठी खास गाड्या सोडलेल्या असल्या तरी दीड ते दोन कोटी भाविक या दोन दिवसांत नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांच्यासाठी रेल्वे हाच पर्याय आहे. परिणामी, रेल्वेत जागा मिळणार नाही.