शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी, वन अधिकाऱ्यांना ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: April 28, 2015 01:29 IST

आदिवासी विकास खात्यात विविध विभागांतून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्याची पद्धत रूढ झाली आहे.

यवतमाळ : आदिवासी विकास खात्यात विविध विभागांतून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्याची पद्धत रूढ झाली आहे. मात्र शासनाने आता या खात्यात कृषी आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास मनाई केली आहे.यासंबंधी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव भि.य. मंता यांच्या स्वाक्षरीने १६ एप्रिल रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वनसेवेतील अधिकारी उपलब्ध न झाल्यास महसूल, विकास, आदिवासी विकास, कृषी, वने या खात्यातील अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची तरतूद होती. १५ जानेवारी २००३ रोजी त्यासंबंधी आदेश जारी केले होते. परंतु आता १६ एप्रिलच्या नव्या आदेशानुसार तो रद्द करण्यात आला आहे. शासनाने राज्यातील २९ आदिवासी विकास प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प संवेदनशील म्हणून घोषित केले असून, या प्रकल्पांमध्ये यापुढे कृषी आणि वन खात्यातील अधिकाऱ्यांना नेमण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षांपासून आदिवासी विकास प्रकल्प खात्यात आर्थिक धुमाकूळ सुरू आहे. प्रतिनियुक्तीवर आलेल्या डझनावर अधिकाऱ्यांनी आदिवासी विकासाच्या योजनांमधील मलाई लाटली आहे. कित्येक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे नोंदविले गेले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी पांढरकवडा, अकोला, धारणी येथे गुन्हे नोंदविले. बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आदिवासी विकास खात्याची होणारी बदनामी आणि लूट लक्षात घेता, शासनाने या खात्याला सर्वाधिक बदनाम करणाऱ्या वने आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘नो एन्ट्री’ केली आहे. गेल्या काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून, तर भारतीय वनसेवेच्या अधिकाऱ्यांनी अपर आयुक्त म्हणून नियुक्त्या मिळविल्या होत्या. आजही नाशिकच्या अपर आयुक्तांचे पद कृषी खात्याच्या अधिकाऱ्याकडे आहे. तर नागपूरच्या अपर आयुक्तांचे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे अतिरिक्त प्रभार दिला गेला आहे. अमरावती अपर आयुक्तांतर्गत पांढरकवडा, किनवट, धारणी, कळमनुरी या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या ४ जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)च्या रिक्त जागांवर नियुक्ती मिळविण्यासाठी वन खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी चालविली होती. त्यासाठी मुंबईपर्यंत फिल्डींग लावली गेली. मात्र शासनाच्या १६ एप्रिलच्या आदेशाने या अधिकाऱ्यांचा आदिवासी विकास खात्यात जाऊन मलाई लाटण्याचा मनसुबा उधळला गेला.