शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींसह अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल होणार नाही

By admin | Updated: July 28, 2016 19:38 IST

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने नागपुरात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २८ : रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने नागपुरात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले. यापैकी एका पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे पिंकी सोळंकी या दोन वर्षीय चिमुकलीचा २०१५ मध्ये मृत्यू झाला. याप्रकरणात कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, संचालक मंडळाचे सदस्य महेंद्र नहाटा, मनोज मोदी, आकाश अंबानी, इशा अंबानी व व्यवस्थापकीय संचालक संजय मश्रुवाला यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे निर्देश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. यामुळे अंबानींसह इतर संचालकांना मोठा दिलासा मिळाला.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.

यासंदर्भात शाहबाज अबरार सिद्धीकी यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. या संचालकांसह मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे), ३३६ (इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात टाकणारी कृती) व ३३७ (इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या कृतीमुळे इजा पोहोचणे) अन्वये गुन्हे नोंदविण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. कंपनीचे संचालक याचिकेत प्रतिवादी होते.

याचिकाकर्त्याने प्रत्येकावर वैयक्तिक व निश्चित आरोप केले नसल्यामुळे याचिकेतून नावे वगळण्याची विनंती करणारा अर्ज संचालकांनी सादर केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. एखाद्या फौजदारी प्रकरणात कंपनी दोषी आढळून आली तरी, कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निवाडा दिला आहे. याप्रकरणात संचालकांविरुद्ध निश्चित आरोप करण्यात आलेले नाहीत. निश्चित आरोपांशिवाय त्यांना दोषी ठरविले जाऊ शकत नाही. यामुळे त्यांना प्रकरणात प्रतिवादी करणे योग्य होणार नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही दिलासा याचिकाकर्त्याला देऊ शकत नाही असे स्पष्ट करून न्यायालयाने सर्व संचालकांची नावे याचिकेतून वगळण्याचे निर्देश दिलेत.