शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ना ‘सायकल’ चालली,ना बसपाचा ’हत्ती’

By admin | Updated: May 20, 2014 22:45 IST

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पार्टी व समाजवादी पाटीर्ची जादू लोकसभा निवडणुकीत या वेळीही चालली नाही.

वाशिम : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पार्टी व समाजवादी पाटीर्ची जादू लोकसभा निवडणुकीत या वेळीही चालली नाही. महाकाय प्रयत्नांनतर बसपाच्या हत्तीने ४८ हजार ९८१ तर सपाच्या सायकलने जेमतेम तिन हजार २६२ मते घेतली. यवतमाळ - वाशिम हा बंजारा बहुल मतदार संघ आहे. पुसद, दिग्रस व कारंजा विधानसभा मतदार संघामध्ये बंजारा समाजाचे मते मोठय़ा प्रमाणात आहे. एवढेच नव्हेतर पुसदरचे आमदार विद्यमान अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक तथा दिग्रसचे आमदार संजय राठोड बंजारा समाजाचेच आहेत. यवतमाळ - वािशमध्ये असलेल्या बंजारा समाजाच्या व्होट बँकेवर डल्ला मारण्यासाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीचे व शिवसेना, भाजपच्या युतीचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. सन २00४ मध्ये पूर्वाश्रमीच्या यवतमाळ लोकसभा मतदार संघातून लोकसभेत पोहोचलेले हरिभाऊ राठोड यांची नौका तारण्यात बंजारा समाजाचेच मोठे योगदान होते. बंजारा समाजाच्या या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेऊन या लोकसभा निवडणूकीत बहुजन समाज पक्षाने बळीराम राठोड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली होती. राठोड काही महिन्यांपूर्वीच साखर आयुक्त पदावरून सेवानवृत्त झालेले आहेत. त्यामुळे बंजारा समाजात त्यांचे चांगलेच वजन आहे. बंजारा, बहुजन व दलीत मतांच्या जोरावर आपला विजय नक्की असे समिकरण बसपाकडुन मांडल्या गेले होते. सन २00९ च्या लोकसभा निवडणूकीत या पक्षाचे उमेदवार दिलीप एडतकर यांना तब्बल ६२ हजार ७३८ मते घेतली होती. त्यावेळी बंजारा समाज कॉग्रेसचे तत्कालीन उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या पाठीशी उभा होता. यावेळी कॉग्रेसने बंजारा समाजाला संधी दिली नाही. त्यामुळे बंजारा समाजाची मते आपल्याकडे वळवून चमत्कार घडविण्याच्या आशेने बसपाने राठोड यांना रिंगणात उतरिवले होते. राठोड यांच्या नावाला असलेले वलय व दलीत व्होट बँक यामुळ े राठोड महायुती व आाघाडीच्या उमेदवाराचे विजयाचे गणित चुकवतील, असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज होता. मात्र अभ्यासकांचे अंदाज सपशेल चुकीचे ठरले आहेत. त्यांना एकूण १0 लाख ३३ हजार४0२ वैध मतांपैकी फक्त ४८ हजार ९८१ मते मिळविता आली. २00९ च्या निवडणुकीपेक्षा हीमते तुलनेने कमी आहेत. विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी असल्याने त्यांच्या विजयावर या मतांचा परिणाम झाला नाही. समाजवादी पक्षाची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. या पक्षानेही कुणाला अडचण आणली नाही.