शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

पंधरा दिवसांत चालकांवर कारवाई होणार नाही

By admin | Updated: July 28, 2016 01:16 IST

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी मुंबईतील पेट्रोल पंपांवर १ आॅगस्टपासून केली जाणार आहे. यात पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यास येणाऱ्या चालकांनी हेल्मेट घातले नसले तर वाहतूक

मुंबई : ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी मुंबईतील पेट्रोल पंपांवर १ आॅगस्टपासून केली जाणार आहे. यात पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यास येणाऱ्या चालकांनी हेल्मेट घातले नसले तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार होती. मात्र सुरुवातीच्या पंधरा दिवसांत कोणतीही कारवाई न करता हेल्मेटसंदर्भात जनजागृती केली जाईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. हेल्मेटसक्तीबाबत दुचाकीस्वारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा नियम काढण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले की, मुंबईत २२३ पेट्रोल पंप असून त्या प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस तैनात केला जाईल. मात्र सुरुवातीला चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेटबाबतचे महत्त्व पटवून देण्यात येईल. सुरुवातीला पंधरा दिवस जनजागृती केली जाईल आणि त्यानंतरही दुर्लक्ष केल्यास दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाईल. वाहतूक पोलीस हे सकाळपासून पेट्रोल पंपावर तैनात केले जातील. मात्र रात्रीच्या वेळी ते तैनात केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)