शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१०वी, १२वीला शिष्यवृत्ती नाही

By admin | Updated: June 24, 2016 05:22 IST

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉ. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे १०वी, १२वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे फिरत आहे

ठाणे : शासनाकडून प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी विविध शिष्यवृत्त्यांच्या योजना सुरू केल्या आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉ. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे १०वी, १२वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे फिरत आहे. आता त्याचा त्रास ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या कोणत्याही योजना नसल्याची माहिती या दोन्ही विभागांनी दिली आहे, परंतु या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांचे पालक मात्र, शिक्षण विभागात फेऱ्या मारत आहेत.सध्या शासनाकडून इयत्ता ४थी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना सुरू आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने १०वी, १२वीतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या फॉर्मचे वाटप १५ जूनपासून शिक्षण विभाग, झेडपी आदी ठिकाणी सुरू केल्याची माहितीदेखील फिरू लागली आहे. तिचा लाभ आपल्या पाल्याला व्हावा, म्हणून विद्यार्थ्यांचे पालक महापालिका शाळा, महापालिका मुख्यालयातील शिक्षण विभागाचे कार्यालय आणि झेडपीच्या शिक्षण विभाग तथा समाज कल्याण विभागात फेऱ्या मारत आहेत, परंतु अशा प्रकारची कोणतीच योजना सुरू नसल्याची माहिती या पालकांना मिळत आहे. जर अशी योजनाच नाही, तर मग याची माहिती सोशल मीडियावर कशी पोहोचली, असा सवाल मात्र, हे विभाग उपस्थित करू लागले आहेत. (प्र्रतिनिधी)