शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीचा बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप

By admin | Updated: March 2, 2017 02:49 IST

शहरातील प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने एनएमएमटी बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केला

नवी मुंबई : शहरातील प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने एनएमएमटी बस ट्रॅकर मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केला आहे. आयआयटीएस प्रणालीवर आधारित हा प्रकल्प दीड महिन्यात प्रत्यक्ष कार्यान्वित होणार असून अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी नवी मुंबई ही पहिलीच पालिका ठरणार आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेचे सर्व परवाने व परवानग्या सुविधा आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रही आॅनलाइन दिले जात आहे. यानंतर आता परिवहन सुविधा अद्ययावत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून एनएमएमटी बस ट्रॅकर अ‍ॅप विकसित केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून एनएमएमटी प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना जवळचा बस थांबा कोठे याची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्या ठिकाणावरून बसप्रवास सुरू करावयाचा आहे तेथून कोणत्या बस कुठे जातात याची माहिती मिळणार आहे. बस किती वेळेत संबंधित बसस्टॉपवर येणार याचीही माहिती प्रवाशांना थांब्यावर उभे असताना एका क्लीकमध्ये उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपचा रेल्वे, मेट्रो व बस सुविधेसाठी वापर करता येणार आहे. बसचे वेळापत्रक, बस थांब्यावर येणारी बस नक्की कुठे आहे, किती वेळात येणार ही सर्व माहिती तत्काळ लक्षात येणार आहे. शहरातील ८१ ठिकाणी एलईडी बोर्ड लावण्यात येणार आहेत. त्यावरही बसच्या वेळापत्रकाची माहिती देण्यात येणार आहे. लवकरच प्रवासाकरिता डिजिटल तिकिटिंग आणि स्मार्ट कार्डचा वापर सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सद्यस्थितीमध्ये ४४५ एनएमएमटी बसेस आहेत. ही संख्या ५०० करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्पलाय बेस सर्व्हिसकडून डिमांड बेस सर्व्हिस देण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पुढील दीड महिन्यात आयआयटीएस प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून अशा प्रकारची सेवा देणारी नवी मुंबई पहिली महापालिका ठरणार आहे. ही प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयामध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणावरून बसेसचे प्रवासी मार्ग, त्यांचा वेग, त्यांची स्थानके अशा सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. परिवहन उपक्रमाच्या बसेसचे संचलन करण्यामध्ये नियोजनबद्ध करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. बस ट्रॅकरमध्ये काय असणार? एनएमएमटी बस ट्रॅकरसाठी आयआयटीएस यंत्रणेचा वापरशहरात ८१ ठिकाणी बसेसच्या वेळपत्रकाची माहितीअ‍ॅपचा रेल्वे,मेट्रोसाठीही होणार उपयोगप्रत्येक बसेसविषयी माहिती अ‍ॅपवर होणार उपलब्धबसेससाठीची प्रतीक्षा थांबणार एमएमएमटी बस ट्रॅकर या अ‍ॅपद्वारे एनएमएमटी बस प्रवाशांना आपल्या हातातील मोबाइलवरून स्वत:च्या प्रवासाचे नियोजन करता येणे शक्य होईल. यामुळे त्यांना वाट पाहावी लागणार नाही व वेळेत बचत होणार आहे. - तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका