शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा डिजिटल शाळांचा प्रकल्प राबविणार

By admin | Updated: May 11, 2016 20:29 IST

महापालिका शाळांचा दर्जा उंचवावा, तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शिक्षण समितीने विविध उपक्रम हाती घेतले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11- महापालिका शाळांचा दर्जा उंचवावा, तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शिक्षण समितीने विविध उपक्रम हाती घेतले आहे. यात सर्व शाळांना संगणक उपलब्ध के ले जाणार आहे. सोबतच प्रायोगिक तत्त्वावर पुढील सत्रापासून दहा शाळांत डिजिटल प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाते. परंतु इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या प्रवर्गातही मोठ्या संख्येने गरीब विद्यार्थी आहे. त्यामुळे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश,मोजे, बूट, दप्तर व शालेय साहित्य उपलब्ध करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. विद्यार्थ्याना सुविधा उपलब्ध करण्यासोबतच शाळांत शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे. यासाठी शाळांची रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळण्याचे साहित्य, पाठ्यपुस्तक योजना, शालेय पोषण आहार योजना, परिसराची स्वच्छता, शिक्षकांना प्रशिक्षण, पटसंख्या वाढ, स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. काही शाळांना आयएसओ दर्जा प्राप्त व्हावा. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत होत आहे. परिणामी सर्वसामान्यांचा महापालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.